Friday, 15 January 2010

सुन्या सुन्या रस्त्यावर





सुन्या सुन्या रस्त्यावर ...
शांततेची ओंजळ....
रीती झाली...!

Thursday, 4 December 2008

उत्सव

चेह-यावर तुझ्या पाहिला...
काल भावनांचा उत्सव जाहला

उमलुन रात्र आली
अलवार श्वास झाला..
झरत गेले चांदणे आरपार
दिशा पांघरुन आनंद शहारला
चेह-यावर तुझ्या पाहिला....

असे कढ ओसरले की
खुळ्यागत दिन गहिवरला
दृष्टीत वस्तीस घन निळा आला
त्या निळाईची शपथ तुला
चेह-यावर तुझ्या पाहिला...

धीर अधीर झाला
कायेस मधुर सुर आला..
क्षण तो सारा, ऋतु बदलाचा
हिरवा पिसारा देउन गेला
चेह-यावर तुझ्या पाहिला...

असा साक्षात समोर दिसलास तु
जसा कण कण माझा हरवलेला
निवळत गेला रंग उन्हाचा
अन मनात समीर सरसरला

चेह-यावर तुझ्या पाहिला
काल भावनांचा उत्सव जाहला......