Wednesday, 2 January 2008

पदन्यास..

असा दरवळु नको आस पास
व्याकुळ होतो बघ श्वास श्वास
लागती वेध मिटल्या क्षणांना
मग उमलावयाची आस आस..

असा आवळु नको नजरेचा फ़ास
शिशिर होतो मग वसंत मास
मन छेद देते सार्‍या नियमाना
कुठला परिघ कुठला व्यास..

असा हळहळु नको, इतका ss ध्यास
जखमांची मांडु नये आरास
काळजातल्या लखलखत्या वीजांना
होते उगीच पेटाया निमीत्त खास...

असा कुरवाळु नको प्रत्येक भास
होउदे एकदा जिवंत त्यास त्यास
तेव्हा बघ करतांना त्या क्षणांना
दिपतील नजरा असा पदन्यास..

Monday, 31 December 2007

नविन वर्षआपणा सर्वांना नविन वर्ष सुखा समाधानाचे आणि समृध्दीचे जावो...!!!!