दिवस आले दिवस गेले,
पुन्हा फ़क्त भास झाले..
नाही वसंत.. नाही शिशिर,
अविरत पावसाळे कुठुन आले
ऋतुचक्राला ना खेद ना खंत
सारे ऋतु निर्विकार झाले..
तु नवा,का दिसतो जुन्यासारखा,
हरएक प्रहराला मी विचारले
उत्तर न देता हसुन ते
उखाणे बनुन मोकळे झाले,
हे असेच जगणे रोज तेच ते..,
कुठे संपला उन्हाळा
कधी सुरु झाला हिवाळा
प्रश्न ऋतुंच्या सीमारेषांचे फ़ार अवघड झाले
उन्हाने झाली काहिली,
आलिया भोगासी क्षणे वाहीली
विचारता त्यांना कुठले ऋण फ़ेडते मी?
देतो वसंताला पाठवुन म्हणुन ऋतु ऋणमुक्त झाले..
दिवस आले दिवस गेले,
पुन्हा फ़क्त भास झाले.....
Sunday, 24 January 2010
Subscribe to:
Posts (Atom)