Monday, 1 October 2007

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते

हेलो..

(त्यानेच फोन उचलला वाटते.. नेमकं नको तेच झाल)

माझा फ़क्त हेलो ऐकुन त्याने लगेच आवाज ओळखला

फोनवरच मला पलिकडुन हुंदका ऐकु आला आणि पाठोपाठ जोरात रडणे..

ऐकवल नाही गेल... काय बोलु पुढे समजल नाही.. तसाच रीसिवर धरुन ठेवला अपराधी भावना दाटुन आली. माँ धावत आली आणि तीने पटकन त्याच्या हातुन फोन घेतला..

"रडु नाही बेटा ममा येतेय म्हणुन तर तीने फोन केला.. "

"नाही आत्ताच्या आत्ता..." रडत हुंदके देत तो परत मुस मुसु लागला.. "

मी फोन ठेवला आणि तडक बस stand गाठले. तीथुनच नव-र्याला फोन केला "मी लेकाला घ्यायला जातेय"पण गाव जवळ थोडेच होते, जायला १० तास लागणार होते.. तोवर बस मध्ये मी त्याच्या हुंदक्यासोबत ते दहा तास कसे घालवले माझ मला अजुन कळले नाही.माझी परिक्षा असायची... दिवसच्या दिवस अभ्यास चालायचा आपल्या पेक्षा आईला ही पुस्तकं जास्त आवडतात म्हणून हा त्यावर पेनान खुप काही खरडुन ठेवायचा. आणि ही मध्येच गायब होते आपल्याला आजीकडे सोडुन, हे सुध्द्दा त्याच्या लक्षात यायचे.. .. (परिक्षेला महिना महिना लागायचा)मग जर मध्यरात्री जाग आली आणि शेजारी मी नाही दिसली तर तीरासारखा मला शोधीत माझ्या study room मध्ये येउन मी आहे की गायब झाली याचा शोध घ्यायचा, मी दिसल्यावर हायसे वाटून मला "चल गोष्ट सांग... कालची नको.." मग मी नवी गोष्ट जुळ्वत सांगत रहाय्चे राजकुमार राक्षसाला मारुन परत येउन सगळं व्यवस्थीत होई पर्यन्त त्याला छान झोप लागलेली असायची..

परिक्षेच्या काळात माझा वाढदिवस आला. घरातल्या सगळ्यांनी फोन लावला याच्या हातात फोन देउन सगळे ममाला "Happy birth day" म्हण सांगत होते याने फोन घेतल्यावर "तु कधी येणारे?" एव्हढेच..

कधी एका जागी बसुन गप्प खेळणी खेळत बसला अस झाल नाही. सतत दंगा मस्ती आणि त्यासाठी ममाच लागायची. बाल्कनीतुन खाली छोटा ओढा दिसायचा तीथे बगळा यायचा त्याकडे बघत जेवल्याशिवाय जेवण गेल नाही. म्हशी याय्च्यात डुंबायला त्या दाखवुन मी म्हणाय्चे "बघ म्हशी..." तेव्हा पासुन एक म्हैस दिसली तरी "ती बघ म्हशी.."

सर्कशीला गेलो तर सगळे रिंगणाकडे बघुन खेळ बघताहेत आम्हि मात्र उलट्या दिशेने बसलेलो, का? तर मागे तंबुत हत्ती बांधलेले होते. मग पुर्ण तीन तास हत्तीसमोर उभे राहुन ते कसे खातात... काय करतात सगळ निरिक्षण चालले होते. जायची वेळ झाली शो सुटला तर "आता हतीला बाय करुन आमच्या घरी ये म्हणाव आम्ही निघालो"

यावर फ़ाडकन "तो जिना कशा काय चढेल? "(किती आपली ममा बावळट एव्हढा मोठा हत्ती आपल्या flat चे तीन जिने कसे चढेल?))
त्याचे हत्तीचे प्रचंड वेड (ते माझ्यकडूनच आले त्याच्याकडे) बघुन त्याला पहिल्यं दा बागेत हत्ती बघायला नेले. तेव्हा समोर एव्हढे प्रचंड धुड बघुन तो कमालिचा अस्वस्थ झाला चित्रात उंदराएव्हढा दिसणारा समोर एव्हढा असेल याची त्या ईवल्याश्या जीवाने कल्पन्नाच केली नव्हती. तशीच स्वारी मागे मागे सरकु लागली.. तोंड न वळ्वता एक टक त्या अजस्र प्राण्याकडे बघत मागे एक एक पाउल सरकु लागला.. "हती माझा मित्ल आहे" म्हणणा-रयाची ती गम्मत पाहुन आम्हा दोघांना हसु आवरले नाही.

नर्सरी सुरु झाली तसे पहिल्या दिवशी कुठेतरी फ़िरायला नेणार म्हणून स्वारी मजेत तयार झाली. जेव्हा तीथे मी थांबणार नाहिये हे त्याच्या लक्षात आले तो पर्यन्त उशीर झाला होता. मला गाडी काढतांना त्याच्या जोरात रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकु येत होता.
हळुहळु त्याला शाळेची सवय झाली. त्याने कधीही तु मला टाकुन का जातेस याची तक्रार केली नाही सतत माझ्यावर लक्ष ठेवुन हीला कुठेही जाउ द्यायचे नाही अस त्याला वाटायचे. एके दिवशी खुप सारं काम अभ्यास वैताग आला होता त्याला कधी नर्सरी त नेवुन सोडते आणि मग जरा निवांत पणे आवरते अस झाल होतं त्याला आंघोळिला घेतले तर अंग गरम लागले. आंघॊळ न घालता तसेच कपडे बदलले पण नर्सरीत नेउन सोडलेच. काही न बोलता तो गप्प बसुन राहिला. घरी आले तसं त्याचा तो गप्प असहाय चेहरा आठवुन खुप अस्वस्थ झाले तशीच परत फ़िरले. तो तसाच डोळ्यात पाणी अडवुन teacher च्या मागे शब्द रखडत बसुन होता. मला लगेच परत आल्याचे पाहुन teacher ने "त्याने आज आंघोळ नाही केली का?" विचारले (तीच्या बीचारीच्या तेव्हढेच लक्षात आले होते) मला बघुन त्याच्या चेह-यावर " आता ही नेणार का परत टाकुन जाणार" असे भाव दिसले. पटकन त्याला उचलुन घेतला आणि चालु लागले तसा तो पण बिलगला.. आणि मघापासुन बांध घातलेले आमचे डोळे वाहु लागले.

आई कडुन एकदा परत येतांना आमची बस पावसात अडकली ओढे, नद्या दुथडी भरुन वहात होते सगळे रस्ते बंद !..

गाडी इंचा ईंचा ने पुढे सरकत होती. पहाटे पाचला पोहचणारी गाडी दुपारचे बारा वाजले तरी अर्ध्या रस्त्यात होती. मागे पुढे ह्जारो बसेस, ट्रक, किलोमीटरच्या किलोमीटर रस्ताभर रांगाच रांगा .. जवळचे पाणी/ खाणं संपलेले . उन्हाने नुस्ते त्याचे हाल होत होते. काय करावे कळत नव्हते रांग हलत नाही अस म्हणुन मी जवळ एक खेडे दिसले तशी बस मधुन उतरले. धावत जाउन दार वाजवले आतुन उत्तर आले नाही दुसरे दार ... तीसरे दार चौथे दार कुणीच पाणी द्यायला सुध्दा तयार होईना कारण रांगामधल्या शेकडो प्रवास्यानी पाणी पाणी करत दार वाजवलेले होते, काय करणार ते तरी बिचारे ..

तशीच मागे फ़िरली तर रांग सुरु झाली होती बसेस पुढे सरकु लागल्या होत्या माझी बस कुठेच दिसेना...

धावत रस्त्यावर आले माझी बस खुप खुप पुढे गेली होती अगदी नजरेच्या पल्याड ... काही सुचले नाही तेव्हढ्यात एक बाइक वर हेलमेट आणि मिलिटरी पोशाखातला माणुस दिसला सरळ त्याच्या मागे जाउन बसले, त्याला विनंती केली.. बस पर्यंत नेउन सोडण्याची.. त्याने गाड्यामधुन वळणे घेत घेत बाइक पुढे काढली माझ्या बस जवळ गाडी येताच मला लेकाचा आवाज कानावर पडला "ममाsssssss ममाssss" सगळे गाडीतले समजावत होते. मी धावत जाउन बसमध्ये चढले. थोड्यावेळाने तो शांत झाल्यावर मला त्या बाइक वाल्याची आठवण झाली.पण तोवर तो कुठेच नव्हता. ........ त्याचा चेहराही मी बघितला नव्हता. ... देवाची आठवण झाल्याशिवाय राहवले नाही.
अशी एक आठवण आली की आठवणींच्या सरीवर सरी धावुन येतात ,... हस-या हळव्या... दोन्ही..

मुल लढायला शिकवते, मुल आपल्याला हळवं करते.... ते आपल्यात जिवंतपणा आणते. हे मात्र खरे..

माझ्या जाण्याची परत येण्याची त्याला सवय झाली job सुरु झाला. office मध्ये त्याला घेउन गेले.
का अभ्यास करवा लागतो ते त्याला त्या दिवशी कळले. खुप खुष झाला..

आम्ही दोघच सिनेमाला गेलो. छान पैकी होटेल मध्ये जेवलो.

आणि एके दिवशी माझ्या transfer चा call आला. पण आता त्याच्यात ती व्याकुळता आणि चल बिचलता सहन करण्याची ताकद आली होती. तो मी घरात नसली तरी राहु लागला. कोवळ्या वयात तो खुप शहाण पण शिकलाय मी रडले तर मला थोपटुन तो जेव्हा शांतपणे शेजारी बसुन राहतो तेव्हा मला प्रश्न पडतो,... हाच का तो? आताच्या आत्ता मला हे आणुन दे ते आणुन दे.. अभ्यास काय करते सारखा म्हणत माझ्या हातुन पुस्तक घेउन खेळ माझ्यासोबत म्हणनारा??

परत आयुष्याची दिशा बदलली नव-याची transfer ...... देश सोडायचा निर्णय झाला . माझी नोकरी ... ??? काय करावे पुन्हा त्याच्या वाचुन रहायची "ती" ताकद मी मिळवलेली नाही हे माझ्या केव्हाच लक्षात आले होते.

मी माझी नोकरी सोडुन जाण्याचा पर्याय निवडला.....

त्याला खुप छान समजुन घेणारे Mr.Fisher मीळाले. त्याला conduct and character चे award मिळाले तेव्हा most liable pupil म्हणुन Miss.Craig ने म्हटले. तसा

टाळ्यांच्या कडकडाटात त्याने तो मोठ्ठा त्याचे नाव कोरलेला कप घेतला तेव्हा माझ्या डोळ्यातल्या पाण्यात माझी office ची खुर्ची केव्हाच विरघळली होती.

कुछ लम्हे

ईर्द गिर्द मेरे बिखरी हुई तेरी बाते

और कुछ सिमटे हुए पल

और कुछ बिखरी हुई सी मै...

एक बिखरे हुए पल में

खुद को उस पल से जोडते हुए...

हर एक लम्हे में तुझ को तलाशती हुइ मै!!!!