Sunday, 13 June 2010

पाऊस

पाऊस मनातला,
पाऊस वनातला..
झिम्माड झाडीतला, गच्च हिरव्या पंखांनी उडणारा...

पाऊस दृष्टीतला...
पाऊस सृष्टीतला,
पिरपिरणारा,किरकिरणारा, आठवणींच्या गर्दीतला..

पाऊस वसुधेचे प्रणयगान,
पाऊस सरितेचे प्रेरणास्थान...
उधाणणारा,बेभान सारा, अंगी रुणझुणणारा...

पाऊस नभाच्या खाणीतला..
पाऊस सप्तरंगी थेंबातला,
ऐटीत बरसणारा,जणु अधिकारी वर्दीतला...

पाऊस क्षणाचा गारवा..
पाऊस भरल्या डोळ्यांचा पारवा..
उध्वस्त नजरेचा,दडलेल्या हुंदक्याचा आसरा..

पाऊस उनाड पोर...
पाऊस रंगीबेरंगी मोर,
नाचरा, भिरभिरा, लहान थोर सा-यांच्या मर्जीतला...

पाऊस आसुसलेला,
पाऊस कासाविसलेला..
डोळ्यातुन टपटपणारा,कवितेत रेंगाळणारा....

पाऊस त्रेधातिरपीट...
पाऊस उन्हाची उघडीप,
अल्लड्,निरागस, लुकलुकु बघणा-या बाळाच्या सर्दीतला..

पाऊस तारेवरचा मोती,
पाऊस धन धान्याची पोती,
धुवाधार कोसळणारा,उन्हाचे उखाणे सोडवणारा...

Sunday, 14 February 2010

दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है.... जी

"ए मारते का ?"
"काय झाले एव्हढे ?"
"तु दोनच दिवस जाणार म्हणली होतीस??"
"trainning programme लांबला त्यात माझा काय संबंध?"
"चार दिवस तुझे दर्शन नाही होणार??"
"मला पण !!!"

त्याच्या मित्राचे आणि मैत्रिणिचे हे बोलणे तो पुर्वी निर्वीकारपणे ऐकायचा. .. त्याला "तीचे" खळखळुन हसणे आठवले.. आणि मित्राने कळवळुन म्हटलेले "मारते का?" पुरेपुर पटले! त्याने उगाच इकडे तिकडे पाहिले समोरचा लव सीन पाहण्याचे टाळले.पाठ फ़िरवुन उभा राहिला समोर झाडी होती अन कोपऱ्यात पिवळे बटर कप फ़ुलले होते. कुणी लावत नाही कुणी पाणी घालीत नाही... तरी कसे रुजते?? काहीही खास प्रयत्न न करता ?? जसे .....! पुन्हा तेच विचार...शेवटी तो हसलाच, स्वतशीच..!त्या पिवळ्या बटर कप प्रमाणे तीही त्याच्या मनात डोलत राहीली. मीच नाही म्हणालो जोरात.. शक्य नव्हते तीला कळतच नव्हते. सगळे शक्य आहे म्हणायची प्रेमात.त्याने सेल फोन काढला . समोरचा लव सीन आटोपेपर्यन्त कुणा कुणाला फोन करत राहिला.




बच्चा माना नही! तय्यार ही नही था.. पडलाच प्रेमात.
खुप खुप रुसलेले हट्टी पोर..., आई खेळायला जायला नाही म्हणली म्हणुन, शाळेत मैत्रिणि हसल्यात म्हणुन,..काय तर म्हणे शेजारच्या काकु म्हणाल्यत थोडी नकटी आहेस ग तु हा नाकाचा शेंडा ना जरा निट टोकदार हवा होता. काहितरी व्हायचे कारण आणि बच्चा रुसलाच पहिजे, या पि्ल्लाच्या मनासारखं कधी जायचे आयुष्य??? पिल्लु भलतच हट्टी, वर्षामागुन वर्षे गेलीत पण हट्टच सोडत नाही, काय करावे?? वाट पाहिली. बदलेल ?? पण अ हं अजीबात नाही दिवसेंदिवस जास्त जास्त हळवे होत चाललेले. खुप हेवा वाटायचा तीला रस्त्याने बिनधास्त जाणाऱ्या लोकांचा.. बेधडक बोलणाऱ्यांचा .. तीने T.V. on केला. आपली आवडती " Last of the summer wines ". तीच्या सारखे हसते, खेळते, innocent... पण एक करुण छटा असलेले आयुष्य! ही करुण छटा मलाच जाणवते की इतरांना पण ?? Roy Clark च्या या सीरीअल चे music सुरु झाले की त्यात एक प्रकारचे करुणपण वाटायचे तीला , हळुहळु वाटायला लागले ही कोणत्याही क्षणाची करुण बाजु आपल्यालाच आधी दिसते का?!! सुन्न परिस्थितीत हसुन हसुन डोळ्यात पाणी येइपर्येन्त पाहिलेली सीरिअल ... डोळ्यातुन अखंड न खळणारे पाणी आणि दोन चार तास ही सेरिअल पाहुन डोळ्यात हसुन हसुन येणारे पाणी... तसे माझे chinese sign ही water च आहे... काये हे मुर्खासारखे बडबडतेय! .. तीने मान वळवली.. 4 वाजलेत . काहीतरी अर्जंट सदर्भ आहे म्हणुन सामीचा फोन येउन गेला होता. रविवारी office ला ?? नको. नको जाउनच येऊ, नाहीतर सामी बदडेल. वर तो साहेब उद्या टोमणे मारणार त्यापेक्शा.. तसच भटकुन पण येऊ. जाण्याधी सामीला फोन करायचा?? नको ती बया बसलेलीच असणार अजुन office मध्ये.

आस पासचे शेजारी म्हणतील निघाली भटकायला..असच म्हणत असणार मला पाहुन.. ..लोकांना काहीच चालत नाही, सवयीने माहित झालेय.... अगदी आपल्याच बागेतल्या शेवग्याह्या शेंगा झाडावर चढुन काढलेल्या किंवा compound वर चढुन आपल्याच झाडाचे लिंबू काढलेले पण चालत नाही.... आपल्याच मस्तीत राहीलेले तर अजिबात अजिबात चालत नाही.... ये बच्चा कच्चा है फ़िर भी किसिकी सुनता नही है... हे पण लोकांना चालत नाही.. "सहज वाटले" म्हणुन... अचानक काहीही केलेले पण चालत नाही....!!

"आज नुसतच टिपुर चांदण्यात फ़िरुन यावे असं वाटतय." काम आटोपल्यावर ती सहज म्हणाली. सामी ने तीच्याकडे आणि बाहेरच्या उन्हाकडे आळीपाळीने पाहीले... "आज अमावस्या आहे ".. सामी शांतपणे म्हणाली.. तीने वैतागुन सामी कडे पाहिले.. तीच्या मनात काय चाललय सगळ माहित असल्यासारखी सामी हसली.. हसता हसता एकदम काहितरी आठवल्यासारखे करुन तीच्याकडे वळली.. सामीचे ते भाव पाहुन.. हीच्या डोक्यात नक्की काहीतरी किडा शिरलाय आणि तो काढण्याचा मुर्खपणा कारायचा नसतो so भागो...! ती अजुन मन चेहऱ्यावर न दाखवता सामीकडे दुर्लक्ष करुन बाहेर पडली..

हवेत अजिबात गारवा नाही फ़ेब्रुवारीच ना?? ह्म्म..उन्हाळा येतोय.. ह आज १४ ना?? हो.. कंटाळा करायला पण वेळ नव्हता मिळाला गेले दोन तीन आठवडे खुप खुप पळापळीत गेले होते .. शब्द्शा पळापळापळीत .. कारण departmental sports होते. दोन दिवस आयुष्यात पहिल्यांदा फ़क्त झोपुन काढले.. (वय झाल्याने थकायला होते अस सामी म्हणाली.)तीला अस म्हणुन उगाच चिडवायला फ़ार आवडते..

गाणी ऐकली खुप खुप खुप...मनात एकच गुणगुणत राहिले....
चाहे तुम मिटाना
पर ना तुम गिराना
आसु की तऱ्हा निगाह्से..
प्यार की उचाई ,
इश्क की गहराई
पुछलो हमारी आह से
आसमा छु लिया रे...
प्यार का राग सुनो..... प्यार का राग सुनो .. प्यार का राग सुनो.. रे....!!

अजुन काय केले एक सिनेमा पाहिला.. ईश्कीया !!! good one!! ... इश्कमय करुन गेला.
दिल तो बच्च्चा है जी.. थोडा कच्चा है जी.. कच्चा ही रहेगा.. इसे ऐसेही रहने दो to be in love and to be wise.. is not possible.. दिल तो पागल है, हळव हळवं करुन सोडणारे एक वेडं पोर आहे.. थोडा नही बिलकुल कच्चा है जी किसीसेभी पुछलो... पुन्हा बडबडायला लागले, तीचे डोळे भरुन आले, का?

तीने गाडी काढली!!!

ऐसी उलझी नजर उनसे हटती नही ..
दात से रेशमी डोर कटती नही...

नको त्या फ़ंदात पडणे यात तर या बच्चाचा हातखंडा आहे.. बेवजहा बातो पे वो गौर करे ,..
दिलसा कोई.. दिल सा कोई कमीना नही.... डर लगता है इश्क करने मे जी..( हा पण वयाचा परिणाम अस सामी म्हणते..): ही कीती सहज असते प्रत्येक ठिकाणी ...

गाडी खड्ड्यातुन ,गर्दीत रस्ता शोधत निघाली.

स्वप्नातल्या कळ्या .. न उमललेल्या.. कदाचित कधीच न उमलणाऱ्या जपुन ठेवलेलेया दोन पानात नवाच आकार आणि रंग घेउन... सतत सोबत!!.... जीवनाची धार दुसऱ्या बाजुने बोथट करणाऱ्या.. .. ती कुठल्याकुठे पोहचली होती... रस्ता पण बघणे गरजेचे होते.

आजुबाजुला बघितले नक्के कुठे आलो???

काहीतरी वेड्यासारखे होणे .. कधी तरी होतेच.. टाळुन उपयोग नसतो .. उपयोग होत नाही, u can try..): त्याला असच काहीतरी म्हणाली होती ती!! बघ की एकदा नुसतं हळवं हळवं होवुन..हरवुन .. स्वतावर प्रेम करायला लागतो आपण.. स्वत:चे अस्तित्व मानायला लागतो.. छोट्या छोट्या कुरबुरी गालातले हसु लपवत ऐकुन घेणारे असते ना कुणी तेव्हा .... त्या सहज निघुन जातात.. सतत पायाला टोचणारे काटे चट्कन निघुन प्रवास सोपा होतो..

ती जागच्या जागी उभी राहीली.कुठे आहोत, काय करतोय क्षणभर काहीच कळले नाही.मग वळुन घराच्या रस्त्याला लागली.

सी.डी. लावली..
नील गगन की छाव मे दिन रैन गलेसे मिलते है
दिल पंछी बन उड जाता है..
हम खोये खोये रहते है..
जब फ़ुल कोइ मुसकाता है
प्रितम कि सुगन्ध आ जाती है..
नस नस मे भवर सा चलता है
दिल पंछी बन उड जाता है...

मधु म कि जलन तडपती है..
यादो की नदी घीर आती है..
हर मौज मे हम तो बहते है..
दिल पंछी बन उड जाता है..
हम खोये खोये रहते है..!!

कहता है.. समय का उजियारा .
एक चन्द्र भी आने वाला है,
इन ज्योत की प्यासी अखियनको
अखियोसे पिलाने वाला है..
जब पत हवासे बजते है
हम चौक के राह तकते है..
दिल पंछी बन उड जाता है..

नाही ऐकले त्याने ,हळवं होणं त्याला कधी आवडतच नव्हते.. valentine day ला कधी wish केले नाही त्याने..!!!

Sunday, 24 January 2010

‌‌‍ॠतु

दिवस आले दिवस गेले,
पुन्हा फ़क्त भास झाले..

नाही वसंत.. नाही शिशिर,
अविरत पावसाळे कुठुन आले
ऋतुचक्राला ना खेद ना खंत
सारे ऋतु निर्विकार झाले..

तु नवा,का दिसतो जुन्यासारखा,
हरएक प्रहराला मी विचारले
उत्तर न देता हसुन ते
उखाणे बनुन मोकळे झाले,

हे असेच जगणे रोज तेच ते..,
कुठे संपला उन्हाळा
कधी सुरु झाला हिवाळा
प्रश्न ऋतुंच्या सीमारेषांचे फ़ार अवघड झाले

उन्हाने झाली काहिली,
आलिया भोगासी क्षणे वाहीली
विचारता त्यांना कुठले ऋण फ़ेडते मी?
देतो वसंताला पाठवुन म्हणुन ऋतु ऋणमुक्त झाले..


दिवस आले दिवस गेले,
पुन्हा फ़क्त भास झाले.....

Friday, 15 January 2010

सुन्या सुन्या रस्त्यावर





सुन्या सुन्या रस्त्यावर ...
शांततेची ओंजळ....
रीती झाली...!