निळाईत जाउन उभे असलले सोनेरी Cathedral, churches ची टोकं , ठिपक्यांच्या रंगीत रांगोळीनी सजवल्या सारखी सगळ्या घरांच्या पुढची garden, ्नेहमी सोबत करत घरांची एक रेष नागमोडी वळणे घेत माझ्या घरापासुन मुख्य market पर्यन्त नेउन पोहचवते.. काळाशार चकाकता डांबरी रस्ता आपल्याला गावभर फ़िरवतो. प्रत्येक सकाळ सुध्दा नवीन रुप घेउन प्रत्येक वेळे समोर येतांना बघुन तर सुरवातीला मी गोंधळलेच होते.
अगदी निदा फ़ाजली ची गजल आठवावी अशी सकाळ...
हवाए सर-सब्ज डालियों में
दुआओं कें गीत गा रही हैं
महकते फ़ुल्लंकी लोरीया
सोते रास्तों को जगा रही हैं
घनेरा पिपल,
गली के कोने से हाथ अपने हिला रहा है..
की बच्चे स्कुल जा रहे है.....
(गावात एकसारखा पिवळ्सर रंग दिसतो ना घरांचा त्यावरुन माझ्या गावाला England's fine yellow stone town म्हटले जाते... बघायची उत्सुकता आहे ना? मग Pride and prejudice बघा त्याच shooting इथेच झालय..)
हाच चकाकता रस्ता जेव्हा गावाबाहेर नेवुन सोडतो तेव्हा.... सारीकडे दिसते ती फ़क्त हिरवाई.. लवलवती हिरवी नाजुक पाती आणि गच्च हिरव्या रंगात न्हालेली झाडी , मधुनच चित्रकाराने brown रंगाचा फ़टकारा मारल्यासारखी काही पाने चमकत असतात.. प्रत्येक ऋतुत नवा रंग नवा ढंग दाखवत ही हिरवी वेस रंग उधळते. प्रत्येक दर्शनात पुन्हा पुन्हा मी या माझ्या गावाच्या आणि वेशीच्या प्रेमात पडते.
क्रमश:
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
किती तरी दिवसानंतर, महीन्यानंतर शांतता बोलु लागली आहे. मी आपल्या बॉगचे अस्तीत्व जवळजवळ विस्रुरुनच गेलो होतो.
किती सुरेख वर्णन आपण केले आहात गावाचे. Pride and prejudice बघायलाच हवा. गजल ही मस्त आहे.
पुढील भागाची वाट पहात आहे.
Post a Comment