Monday 8 October 2007

असच काही

शब्दांचा तळतळाट पेलवत नाही
नकोच म्हणतात जेव्हा कागदावर उतरायला..
कुणी नसते सोबतीला...
नुसतीच शांतता...!!!
तीही नुसता गोंधळ घालते आणि
त्या क्षणाचे जीवन नुसतेच क्षण
बाकी काही उरत नाही.
सुख म्हणते "आप कतार मे है...!!"
काही क्षणातुन मिळणारे दुखाचे बाय प्रोडक्ट ..
ते सांभळता सांभाळता नाकी नौ येते..

"नुसते" बिना बाकीचे क्षण नकोसे होतात....
मला सरत्या उन्हातले रसरसते क्षण हवेत..
धुक्याच्या आवरणातले
अस्पष्ट आकृतीतूनु उमटणारे
मनाच्या कोप-यात पडुन
सुगावा न लागु देता स्क्रिन सेव्हर सारखे..
निश्चल मनात तरंग उमटवणारे.. ,

एकात एक गुंतलेले काही क्षण
त्यांचे कोडे कधी उलगडत नाही
सगळ्या बाजुने बघा ते तितकेच गुंतागुंतीचे..
आपल्यालाही गुंतवुन ठेवणारे..

कोडे सुटत नाही..
नुसतीच उत्तराची वाट पहाणे
अन त्या क्षणांचे तेच जुने बहाणे..

एखाद्या दिवशी क्षण क्षण जीवन बनते..
न सुटलेल्या कोड्याचेही काही वाटत नाही..
श्वासांचा ईतिहास लिहिला जातो आणि
क्षणाचाही विलंब न लावता.. माझ्या हाकेला "जिंदगी "
"ओ" देते..माझ्या आवाजातुन..
माझ्या हसण्यातुन.. माझ्या दिसण्यातुन..
माझ्यातली "मी" पुन्हा नव्याने उमलते..

मै उसकी परछाई हूँ
या वो मेरा आईना है
मेरे ही घर में रहता है
मेरे जैसा जाने कौन...!!!

4 comments:

priyadarshan said...

मौजे ग़म से कोई ना हो मायुस । जींदगी डुबकर उभरती है ।
आपण सुरेख व अर्थपुर्ण कवीता लिहीली आहेत.
जीवनात चढउतार असायचेच.

दुखाचे बाय प्रोडक्ट ..
ते सांभळता सांभाळता नाकी नौ येते..
गेले कित्येक वर्षे मी ते क्षण सांभाळत होतो पण आता
"एखाद्या दिवशी क्षण क्षण जीवन बनते"

जीवन किती संदर आहे.

Kamini Phadnis Kembhavi said...

अशि तगमग नी लाही लाही
जीवनाला कोण घाई
सुख शोधता शोधता
मन बावरुन जाई

Vaishali Hinge said...

priyadarsahn .. trumhi naav badalale good..!!!
tumachii prateekriyaa kiti Chaane!!
aani shyamalii kyaa baat hai..
अशि तगमग नी लाही लाही
जीवनाला कोण घाई>>>>> kharay!!!

तुषार खरात said...

माझ्या ब्लॉग पाहून प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद ! शिक्षण क्षेत्रात भारताची स्थिती खरोखरच बिकट आहे. शिक्षणावर विविधांगी चर्चा व्हावी, या उद्देशाने मी हा ब्लॉग सुरु केला आहे. तुमच्या प्रतिक्रीयेचे स्वागत !
आणि हो...तुमचा ब्लॉगही अप्रतिम आहे....!