Monday 22 October 2007

वेशीचा पहिला फ़ेरफ़टका

सळ्सळ्णा-या सापासारखा गर्द झाडीतुन रस्ता पुढे धावत असतो. आयुष्यात धावणे कधी संपतच नाही याची आठवण करुन देणारा..!!! सुरवातीला वेड लावले होते त्याने.कारण आल्या आल्या जे नव्या देशात आल्याचे थोडे दडपण थोडे रिकामपण आले होते त्यातुन हा मार्ग निघाला. तेव्हा Internetची ओळख व्ह्या्याची होती. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि कुतुहल शमले..पण धावण्याचे वेड संपले नाही. कधी एकटीच तर कधी माझी रेड कोर्सा सोबतीला घेउन तर बयाचदा सायकल जंगलातुन झाडापानातुन तो-यात चालणा-या फेजंट्च्या जोडीने. ब्लक बर्ड्च्या किलबिलाटात हिरव्या वेशींना भेटी देणे मला मनापासुन आवडु लागले. ह्या एकांतात भिती नव्हती. त्यामुळे मोकळेपणाने फ़िरता आले.
berries चे दिवस संपलेच आहेत जवळ जवळ आणि तुरळक काही जाळ्यात black berries तेवढ्या शिल्लक आहेत . शिशिर भरात आहे आणि हिवाळा येउन ठेपलाय. दिवस लहान होऊ लागलाय. तरिही प्रत्येक वेळी प्रत्येक ऋतुत हा रस्ता इतका सुंदर दिसतो ना.जसे सुंदर स्री कशीही सुंदरच दिसते. सरळ Tolbar ओलांडुन Castortan ला न जाता. Little Castorton ला वळुन उभी चढण सायकलीने धापा टाकत चढावी(कारण शाळा सुटली तशी सायकल परत हातात आत्ताच आली) आणि टोक गाठताच समोर चरत असलेला रुपेरी घोडा धावत फ़ुरफ़ुरत त्याच्या फ़ाटकाशी येतो .अजिबात आढे वेढे न घेता आपल्या हातातले तीथलेच खुडुन घेतलेले गवत चघळत मान लवुन प्रेमळ नजरेने बघत मध्येच डोळे मिटुन निवांत उभा राहतो. मग मलाही निवांत उभे राहण्यावाचुन गत्यंतर नसते.तसा दम लागलेला असतोच. समोरच्या चरणा-या मेढ्यांना आजही काही फ़रक पडत नाही .नेहमीप्रमाणे खाली मान घालुन दिवस रात्र चरणे चालु. त्यांचे एक बरय त्यांना ना मायेने कुणी जवळ आलेल खपत ना ही माया करुन घ्यायला जायला, शेळी,गाय,घोडा कुत्रा ,मांजर अगदी कोम्बड्या सुद्धा येतात.पण मेंढ्या अह..!
मंद वा-याचे संगीत सोबतीला घेउन बार्ली डोलत उभी असते फ़िक्कुटलेल्या आभाळात ब-याचदा ढगच असतात .सुर्य सदानकदा लोळत पडलेला त्या मऊशार अंथरुणात. कधीतरी डोकाउन तरतरी देवुन जातो. त्या बरोबर लांबवर पसरलेल्या गोल गोल टेकड्यांना झळाळी मिळते. पाने नाचुन घेतात... गवत डुलुन घेते, वा-या सोबत बार्ली अजुन ताल पकडते. थंडगार
वा-याची झुळुक मानेवर आलेल्या घामावर फ़िरुन एक अजब शहारा ऊमट्वत गालावरुन शरिरभर फ़िरते. अंगावर काटा उभा राहतो थोड्या उष्णतेची गरज आहे अशी जाणिव होताच पुन्हा सायकल जोर पकडते.चढणीवरुन रस्ता घसरगुंडीसारखा उताराने Little Castorton गावात शिरतो. Shakespeare Tolthorpe वर आता जाणा-या गाड्यांची वर्दळ कमी आहे. कारण summer संपलेला आहे. तेथे छान open theater आहे. जेव्हा Shakespeare कळु लागेल तेव्हा बघेन अस मी मनाशीच पुन्हा म्हणत त्याच्या वरुन वळसा घेते. उतार संपुन पुन्हा चढ लागलेला असल्याने मला जरा थकुन इथे उतरावेच लागते पण तरि निवांत रमत गमत चालायला आवडते एक टुमदार एकांडया धीट शिलेदारासारखे एक घर इथे आहे. उंचच उंच दाट ओक ,चेस्ट्नट, मेपलची झाडी लागुनच कुरण आणि पुन्हा झाडी पलिकडचे थोडेसुद्धा कधी दिसत नाही. कधितरी तेथील जोडपे संध्याकाळी हातात वाईनचे ग्लास हातत घेउन रेलुन उभे असते. हसत हसत गुड ईव म्हणत पुढे जावे. कारण संवाद यापुढे फ़ार तर वेदर वर घसरेल त्यापुढे जाणार नसतो. पुन्हा एक मानेला झटका दिल्यासारखा उगाचाच लांब वळुन रस्ता उतार पकडतो सायकल हातात असली तरी उतारावर पाय धावु लागतात आणि तालबद्ध पाण्याच्या वाहण्याचे संगीत कानावर पडते. चुळुक बुळुक करत शुभ्र पाणी काठावरच्या लव्हाळींनी गुदगुल्या केल्यासारखे खिदळत चकाकत असते. अंगणात मुले चेह-यावर निरागस भाव घेउन एकमेकांच्या खोड्या काढुन खदखदतात, खुलुन हसतात ते पाहुन बाजेवर बसलेल्या म्हाता-या माणसांच्या गालातल्या गालात जसे हसु येते तसे तळाचे दगड गोटे बघुन वाटते. पाण्याच्या निरागस झुळझुळ हसण्याने त्यांनाही तसेच वाटत असावे. winter संपायला आला की आता फ़ुलायची वेळ आहे ही वर्दी द्यायला इथे snow drops झाडांच्या बुंध्याशी येउन थडीने गारठलेल्या वातावरणात जिवंतपणा आणतात. snow drops इतक्या नजाकतीने फ़ुलतात ना त्यांना जवळुन बघायला आपण आपोआप त्यांच्या पाशी खाली झुकतो. ground वर जमलेल्या चिल्ल्यापिल्यामध्ये जी चिव चिव होत असते ना तसेच अगदी हे snowdrops एकमेकांशी बोलत असावेत. त्यांचे खेळ आटोपल्यावर वसंतात इथेच काठावर पाण्याची दंगामस्ती बघायला daffodils गर्दी करतात. पिवळ्याधम्मक daffodils च्या आनंदाला उधाण येते. college च्या किंवा एखाद्या stadium च्या आवारत आपल्या आवडत्या तरुणाला खेळतांना बघायला सजुन सवरुन आलेल्या तरुणी ज्या उत्सुकतेने बघतात तसे ह्या daffodils च्या कळ्या काठावर दाटीवाटीने उभ्या राहतात.आपल्याच सौदंर्यात मग्न स्वतातच रमुन त्याच स्वप्निल नजरेने आजुबाजुला बघत बाकी कसलेही देणे घेणे नसल्यासारख्या महिना दोन महिने आपल्याही डोळ्यांना सुखावत त्या डुलत राहतात. अन..
(Wordsworth ची Daffodils तरंगत समोर येते
(क्रमशा:)...

4 comments:

priyadarshan said...

zzओ हो , ख्या बात है . किती सुरेख वर्णन केले आहेत ,
हि बहुदा माहोल ची बेहोशी आहे,

या वर लतानी गायलेले रागरंग या चित्रपटात एक सुरेल गीत आहे. नेमके मला आठवत नाही.

"यही बहार है दुनीया को भुल जाने की खुशी मनानेकी
यही घडी है जवानी के गीत गुनगुनानेकी, हा, मुस्कुरनेकी
ये प्यारे प्यारे नजरे ये ठंडी ठंडी हवा, ये हल्कासा नशा, ये कोयलोंकी सदा, निकलके आ गयी रुत मस्तीया लुटानेकी खुशी मनानेकी "

काल मी सुद्धा पुणयात जपानी पद्धतीने बनवलेल्या उद्द्यानात असेच काहीतरी अनुभवले, लिलिची सुंदर फुले फुलली होती , त्या वेळी नक्की कसे वाटायला हवे होते हे आता हा लेख वाटताना जाणावतेय.

आपल्या या लेखातील "जसे सुंदर स्री कशीही सुंदरच दिसते." व गेल्या लेखातील "आईना" वरुन गालीबचा शेर आठ्वला

आईना देख अपनासा मुहं लेकर रह गयी
साहब को दिल ने देने पर कितना गरुर था ॥
कासीद कि गर्दन अपने हातो ना मारीये
ये उसकी खता नही मेरा कसुर था ॥

Nandan said...

upama (bajevar basalelya mhataryanchya hasanyasarkhe) aaNi varNan surekh. lekh aavadala.

Vaishali Hinge said...

हो प्रियदर्शन माहोलचीच बेहोशी..!!! नाहीतर निर्मनुष्य टापुवर आपली भषाही विसरायला होते.
थन्क्स नन्दन...!!!

priyadarshan said...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!