Tuesday 11 December 2007

भरतीला आलेल्या सागरात
शिंपल्यातील मोती..
शोधतांना...
डोळ्यांच्या ओलसर कडा
सुकवायला खारा वारा
कमी पडतो तेव्हा
कोमेजलेल्या स्वप्नांना
उराशी कवटाळुन
दोन मुक हुंदक्यांचे
शिंपण घालते,
कधी वाटते त्या भरतीस
करावे नखशिखांत समर्पण,
जावे खोल खोल
त्या गडद अंधार्‍या पाण्याच्या
गर्भात बुडुन
सोडुन द्यावे अस्तीत्वाशी लढणे
पण..
परत भानावर येउन शोधत राहते किनारा...
मिसळत रक्तात ते खारे पाणी...

6 comments:

priyadarshan said...

वा . क्या बात है !

Tejaswini Lele said...

छान!

HAREKRISHNAJI said...

The most beautiful template, I must say.

coolkarni said...

Apratim!!

HAREKRISHNAJI said...

येत्या नवबर्षात येणारा प्रत्येक ॠतु बसंता प्रमाणॆच बहरलेला असावा, शिशीर प्रमाणे आल्हाद दायक असावा, ही सदिच्छा.

Vaishali Hinge said...

धन्यवाद सगळ्यांना!!!
आपल्याला सगळ्यांना हे नविन वर्ष सुखासमाधानचे जाओ..!!!