Monday, 28 January 2008

जानेवारी.....

जानेवारीच्या सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर ईपिंगहम रोडवरच्या तपकिरी घरांआडुन सुर्य हसतांना दिसतो... बाजुच्या A1 वर गाड्यांनी रोजची गती पकडलेली असते. या आधी दोन महिने याच वेळी तीथे फ़क्त काही प्रकाशाचे कवडसे ढगाआडुनच वर्दी देत असायचेत... "अजुन स्वारी लोळतेय" अस सांगत...
सकाळी घराबाहेर पडतांना गारव्याने गारठलेल्या हातांनी गाडीच्या काचेवर साठलेल्या,कौलांवर भुरभुरलेल्या,गवताला ताठरवुन गोठवणा-या शुभ्र रांगोळीला पुन्हा पुन्हा मी उचलुन घेते.....
अंधा-या रात्रीचे स्वप्न सकाळी गायब होते तसे ते हाततले शुभ्र कण हळु हळु माझ्या डोळ्यादेखत आकारहीन होतात अन हातातुन घरंगळुन जातात अगदी आपल्या अधु-या स्वप्नांसारखेच....

कधी दिवसही रात्रीला कवटाळुन असतो. धुक्यात उगवतो.. मस्त असते हे धुके.. ,जगाचे अस्तीत्वच पुसायला निघालेले...!!!
..पेन्सिलीने काढलेले चित्र अर्धवट खोडल्यावर जसे दिसते.. अगदी तसेच वाटते आस पास्,
त्या चित्रात बसुन आजुबाजुच्या ..विरघळ्णा-या सृष्टीत दाखल व्हावे आणि संकोचाचे धुके बाजुला करुन मनसोक्त मनकवड्या जगात मनकवडे होवुन जावे... !
हात उंच करुन बोटे पसरुन आळस झाडत उभी असलेली झाडी,वळणा वळणावर.. लुप्त होणारा ओला fresh चकचकीत रस्ता,थंडीने आखडुन शेकोटीला बसल्या सारखी बैठी घरे.. शाळेत जाणारे, लोकरीच्या गुड्यांत गुंडाळलेले गोबरे गाल अन चमचमते इवले इवले आनंदी डोळे.. सकाळचा सगळा हा "freshness" नजर फ़िरवता फ़िरवता मी गोळा करत जाते........
रस्ता ओलांडुन मी टीनवेल कडे वळते... तीथे रस्त्यावरची मोठीच्या मोठी ओक,चेस्ट्नट आणि एल्म्ची झाडी नुसतीच उभी असतात. रिकामटेकड्या खेड्यातल्या म्हता-यासार्खी.... रस्त्यवरची गम्मत बघत.. मी त्यांची गम्मत बघत.. रस्त्यावरुन चक्कर मारते.. जाड्या, बारक्या,काटकुळ्या प्रत्येक फ़ांदीवर स्व्तंत्रपणे कोंब यायला सुरवात झालेली...प्रत्येक कोंब हेsss.. मोठाच्या मोठा.. अगदी लीलीच्या कळीसारखा..! पण ही गर्भावस्था सोडुन यायला बराच वेळ आहे. त्याधी फ़ेब्रुवारी आणि मार्च जायचाय. प्रत्येक झाड हे गर्भरपण आनंदाने मिरवत उभे... अगदी झुडुप सुध्दा....ही बाळं अंगाखांद्यावर सांभाळतांना ह्याच सगळ्यांची नंतर धांदल उडणार असते.

टिनवेल संपले की लगेच थोड्या अंतरावर केट्न..... सुरेख सुरेख सुरेख.. लाइम स्टोन्ची घरे, चर्च... पब.,त्यांच्यामधुन खिदळणारा झरा.. वर round bridge उंच उंच सायकामोर,पाइन.. आज माझा पाडाव इथेच... दिवसभर! माझी गाडी रस्त्याच्या कडेला लावुन मी माझे painting चे सामान बाहेर काढते. खुर्ची टाकते, समोर छोटा टीपोय टाकुन बस्तान बसवते. मग कॆनव्हास वर समोरचे चर्च.. वळणारे फ़ेन्स.. झाडीतले पाणी.. पबची फ़ुलांची bucket (हिवाळा अस्ल्याने त्यात ह्ल्ली नकली फ़ुले आहेत.. हीच फ़ुले समर मर्ध्ये जेव्हा जिवंत होतात तेव्हा.. अहा हा.....) अस काही बाही जे आवडेल ते सगळं.. आकार घेत रहातं.. मधुनच मी पब मध्ये जाउन चक्कर मारुन येते.. जुने.. लाकडी पब, सुबक देखण्या खानदानी आजीबाईसारखे..!!!
ही समोर दिसणारी चढण चढुन गेले की.. एक आज्जीबाईंचे farm आहे.. घर जरा आत आहे,.. शेवटी सगळ्यात पण तीकडे जायचे खास कारण म्हणजे या आजी.. दाराबाहेर घरी बनवलेले oarange मार्मालेड,srawberry jam,apple pie,cherry pie,दार्रातले पीच... आणि काय काय अजुन.. ह.. गावठी अंडी अस ठेवतात. मग तीथल्या डब्यात पैसे टाकुन मी एक मारमालेड आणि एक अंड्याचा पॆक उचलते.. उद्याच्या brekfast.. ची चव आताच जीभेवर जाणवायला लागते.. ,रस्त्यावर कुणीतरी आजी नाहीतर आजोबा भेटतात.जुन्या आठवणींचे अल्बम त्यांच्या नजरेने मला दाखवुन मार्गाला लागतात. ब-याचदा ते तीथेच लहानाचे मोठे झालेले..,जवळ पासच्या शाळेत तेव्हा पायी पायी या fence वरुन उड्या मारत गेलेले.. गायी, मेंडःया कोंडण्यासाठी, नाहितर बार्ली कापणीसाठी आई वडीलांना मदत करत आपल्या बदकाच्या ,कोंबडीच्या नाहितर टर्कीच्या मागे पळालेले असतात, याच हिरवळीत हुंदडत .मेंढ्यांची छेड काढत.... वेलिग्टन बूट्स घालुन आपल्या आई पप्पांसोबत चिखल तुडवत sunday lunch नंतर walking केलेले असते. तीथेच कुणाशीतरी सुर जुळलेले.. त्या समोर दिसणा-या पब मध्येच गाठी भेटी घडलेल्या... आता तो/ती अद्नाताच्या प्रवासाला निघुन गेले..आणि मुले कुठेतरी जर्मनीला.. औस्ट्रेलीयाला, नाहितर लंडन ला... एकटे ..पुर्ण एकटे आयुष्य.. बागकाम,चर्चचे काम , painTing नाहितर अजुन काही छंद..हाच विरंगुळा...
दुपार होता होता मी पण भरुन आलेली पाठ ताठ करते, ब्रशचे काही शेवटचे फ़टकारे मारते.
पब मध्ये जाउन गरम गरम soup of the day पोटात टाकल्यावर भेटलेल्या आयुष्याचे काही रंग, त्या दिवसाकडुन मला मिळालेले आठवणींचे रंग.. कॆन्व्हास वर उमटलेले रंग आणि त्यांचे आकार असं सगळा जामानिमा गोळा करत मी जेव्हा तीथुन घराकडे निघते तेव्हा चार वाजता..उन्ह एका दिशेला गोळा होवु लागलेली असतात....
जानेवारीतला दिवस.... रात्रीकडुन दिवसाकडे नेणा-या मधल्या पहाटेसारखा असतो.. तितकाच fresh,नवी सुरवात करणारा...हिवाळ्याच्या अंधा-या जगातुन समरच्या लख्ख उजेडाकडे नेणारा...

जुने दिवस सरले
लिहुन काही भाळी
आता नवी पहाट व्हावी
फ़िरुनी उरात भरुन घ्यावी
नवी धुमारी आशेची
स्वप्नांच्या बिल्लोरी काचेची....!!!

6 comments:

a Sane man said...

surekh chitramay zalay....mast...january chya fresh sakaLi vachtana ajunach fresh vatla!...

Anonymous said...

Chan,
रात्रीकडुन दिवसाकडे नेणा-या मधल्या पहाटेसारखा असतो.. he vishesh avadale.

HAREKRISHNAJI said...

वा !!

हे वाचतांना आपल्याला आलेली अनुभुती वाचतांना आम्ही पण घेत असतो, जणु हे सारे वाचतांना तेथले दृष्य डोळ्यासमोर साकार होत जाते, वाटते की आपण ही याच स्थळी आहोत.
हे आहे शब्दाचे सामर्थ.
आपले पेटींग्स पण बॉग वर टाकाना, आम्हाला ही हे निसर्गाचे, ऋतूचे हे सोहळे भरभरुन पाहुन द्या की.

Vaishali Hinge said...

खुप धन्य्वाद!!! सेन मन..
अनोनिमस.. thank you..!!!
हरेक्रिश्नाजी.. आज नक्की टाकते लेख.. आणि चित्रे पण टाकेन काय होते कुठल्ल्या चित्रात काही तरी राहिलेले कसले फ़िनिशिंग अपुर्ण अस करुन .. राहतेच रोज ..आणि आता नवरा भरत गेला तर त्याच्यासोबत बरीच पेंटींग आई ला गिफ़्ट म्हणुन्न पात्ठव्ली आणि माझ्या अर्ट ग्रुप मध्ये काही सबमिट केली..

Nandan said...

shabdanni faar surekh chitra rekhatala ahe.
पेन्सिलीने काढलेले चित्र अर्धवट खोडल्यावर जसे दिसते.. अगदी तसेच वाटते आस पास्
-- surekh upama.

Vaishali Hinge said...

thyank you very much नंन्दन!!