Saturday 2 February 2008

आपली आपली मॅरॅथॉन .......

(
आपल्या प्रायोरीटीत शरीर हे सगळ्यात शेवटी असते कारण स्वतापेक्षा दुस-यांकडे लक्ष द्या( याचा अर्थ नाक खुपसणे असा च असतो ब-याचदा)... त्याग करा.. ही आपली संकृती... त्यामुळे आपल्या शरीराकडे लक्ष देणे हा रोजच्या जीवनातला दुय्यम भाग आहे. ब-याच जणांना..हे ऐष करणे वाटते.. तर बायका घरात एव्ह्ढे काम करतो आणि वर व्यायाम? वेळ कुठे आहे असले उद्योग करायला? म्हणून व्यायमा पासुन लांब असतात.. आपल्या रुटीन मध्ये का कोण जाणे शरी्राकडे लक्ष देणे फ़ार आलेले नाहीये.. माझ्या बदलीच्या तालुक्याच्या गावी.. मी सकाळी लवकर उठुन जवळच्या खेड्यापर्यंत चालत जाउन यायचे तेव्हा आमचे घरमालक आणि मालकीण, त्यांची कॉलेज मध्ये जाणारी मुले नुकतीच आवरुन बसलेली असायची. माझ्या व्यायाम प्रकाराकडे सगळेच फ़ार विचित्र नजरेने बघायचे..शहरात तरी थोडे.. वातावरण आहे पण तालुक्याच्या गावी म्हणजे फ़ार विचित्र.. रस्त्याने कोलेज मधली मुले .. " काय exercise का? म्हणुन टोमणा मारायचीच, नाहितर दात विचकुन हसुन पुढे जायचीत.. पण मला त्याने फ़ार काही फ़रक पडायचा नाही..) त्याच वेळी ५..६ वर्षांपुर्वी हे कात्रण युवा सकाळ मधुन काढुन ठेवले होते ते जसेच्या तसे इथ देत आहे.. हा लेख मला मार्गदर्शक म्हणुन मी वापरला.. आणि आता हरेक्रिशनाजी यांच्या blog वर वाचुन मला हा लेख इथे टाकावासा वाटला..) .



.तीन वर्षांपुर्वी न्युयार्क शहरातील एक दुपार. एका प्रसिध्द बॅंकेत जगभरातील निवडक अशा चलाख गुंतवणुक दारांसमोर एक तरुण उद्योगपती बसला होता .आमची इंडस्ट्री ही भारतातील एक मोठी इंडस्ट्री आहे.आमच्या मध्ये तुम्ही पैसे गुंतवा.ते सुरक्षीत राहतील आणि दामदुपटीने वाढतील. अशी त्यांना माहित देत होता. त्याने सादर केलेले सर्व balance sheet ,आकडे त्या गुतवणुकदारांना पटत होते. त्यातल्या एकाने या तरुण उद्यो्गपतीला ताडकन विचारले,"जगभराचे पैसे तुमच्या idustry मध्ये येतील, तुमचा उद्योग चांगल्या condition मध्ये आहे पण... तुम्ही स्वत: आहात काय?
हा प्रश्न अगदी अनपेक्षीत पणे ऐकुन तो तरुण चपापला असावा. त्याने स्वत:कडे पाहिले . तो दारु पीत नव्ह्ता. सिगारेट ओढत नव्ह्ता पण लेट नाईट्रल आणि जगभरातले चमचमीत खाणे याने त्याचे वजन शंभर किलोवर गेले होते आणि ते त्याच्या शरीरावरुन सहज दिसत होते.
काय विचार आले असतील त्याच्या मनात? तो रागवला? मनातल्या मनात् म्हणाला असेल , काय तुझ्या बापाचे खातो का? का त्याने समर्थन केले असेल ? मी दिवसातुन १४ तास् काम करतो म्हणुन मला व्यायामाला वेळ नाहि. त्याने यातले कुठलेच उत्तर दीले नाही. शांतपणे म्हणाला "You are right, next time you will see the difference...!"
भारतात गेल्यावर त्याने दोन आहारतज्ञांना बोलावले. ही आई मुलीची जोडगळी भलतीच कडक निघाली. त्यांनी प्रथम विचारले "तुम्हाल नक्की वजन कमी कारायचे आहे ना?"त्यासाठी श्रम करायची तयारी आहे ना?? "
लगेच order सुटली.. चहा, कॉफ़ी बंद.. बापरे! हा तरुण तर दिवसातुन दहाबारा कप चहा प्यायचा...
चहाबरोबर दुध बंद, लोणी बंद, जॅम बंद, साखर बंद.. यांची यादी वाढतच चालली.. याने मान डोलावली..

पुढचे काही महिने याने फ़ळांचे रस, फ़ळे, उकडलेल्या भाज्या यावर काढले .पोटात भुकेचा डोंब उसळल्यावर एका रात्री याने या बाईना फोन केला.. " खुप भुक लागलीये .. झोप येत नाही.. काय करु?" त्यावर "एक ग्लास पाणी पीउन शांत झोप " असे उत्तर आले..
हळु हळु याला आता त्या कडक डायेट्ची सवय झाली. त्याचा थकवा नाहिसा झाला. त्याला झोप लागु लागली. अधीक ताजे तवाने वाटु लागले, तो न दमता , न थकता काम करु लागला. इतके दिवस चमचमीत खाणा-या त्याच्या जीभेला आता साध्या पदार्थात गोडी वाटु लागली.
साधा आहरही चविष्ट असु शकतो हे पटु लागले. त्याचे वजन उतरु लागले. तो १०० किलो वरुन ७० किलोवर आला.

दोन वर्षानंतर परत तो न्युयार्क ला आला असता त्या प्रश्नकर्त्याला भेटला. पण त्याने म्हटले "This is good, but is it enough ?" म्हणजे? ते पुरेसे नव्हते. आपल्या न्युय्यॉर्क च्या दौ-यात त्याने तेथील मॅरॅथॉन पाहिली. आपण हे करु शकु? २६.२ मैल धावणे. या तरुण उद्योगपतीला चलेंजेस आवडतात. न्युयोर्क मॅरॅथोन मध्ये दर वर्षी कमितकमी ३०००० लोक धवतात .त्यातील किमान ५०० पंच्याहत्तरी ओलांडलेले असतात. तर काही नव्वदी पार केलेले असतात. ह्यात तुमची स्पर्धा असते स्वत:शीच तुम्ही चिकाटी दाखवत परिश्रम करत धावतात. तुमचे श्रम, चिकाटी हाच तुमचा आनंद.. या तरुणाने प्रयत्न सुरु केले.

मुंबई पहाटेचे तीन वाजलेत, सर्व जग झोपलेले असता हा तरुण उठतो. एक ग्लास फ़ळांचा रस पिउन आपल्या जिम मध्ये जातो. अर्धा तास "warm up" करुन पाठीवर दहा किलो वजन बांधुन २० मजली इमारतीचे जीने धावत चढतो.. मग खाली आल्यावर तो driver ला सांगतो. आज आपण सहार एअर पोर्ट पर्यंत पळायचे आहे. कुलाबा ते अंधेरी आणि परत!सोबत त्याची गाडी.
तो धावायला सुरवात करतो..त्याची पावले एकापुढे एक पडताहेत त्याच्या धावण्यात लय आहे. तो धिम्या गतीने धावतोय. सध्या रस्त्यावर कुणीच नाही. फ़क्त काही दुधाच्या गाड्या आहेत. तो पळतो आहे.
हळुहळु पहाटेची वर्दळ वाढली आहे.पहिल्या पाळीचे कामगार ,शाळेत जाणारी मुले त्याच्याकडे कुतुहलाने बघतात. त्यांना बाय करीत तो धावतो आहे. खाच खळग्यातुन-खड्यातुन, चढ उतारावरुन त्याची पावले पडताहेत. .आता त्याला मॅरॅथोन मध्ये धावायला ४ तास लागताहेत. दिवसातुन दहा तास बैठे तास करणा-याला ४ तास ही वेळ चांगली झाली.तो आठवड्याला १०० किलोमीटर धावतो. महिन्याला ४०० किलोमेटर म्हणजे पुणे ते मुबई आणि परत .. तीन वर्शांपुर्वी एक जिना चढतांना त्याला धाप लागयची..

हा उद्योगपती आहे "अनिल अंबानी"..
तो म्हणतो " पैशाने तुम्ही सगळ विकत घेउ शकता पण तुमचे आरोग्य तुम्हालाच श्रमाने कमवावे लागते..."

ध्येय निश्चीत कराय्चे .. मग कुठल्याही क्षेत्रातले.. आरोग्य,अभ्यास, खेळ.. ते साध्य करण्यासाठी काय करायला हवे याची माहिती घ्यायची आणि दररोज न चुकता प्रगती कराय्ची.
पण ध्येय साध्य झाल्यावर आपली पाठ थोपटुन नाही घ्यायची.पुन्हा मागे नाही वळायचे.


तर मंडळी कधी धावयची आपली आपली मॅरॅथॉन????

16 comments:

A woman from India said...

लोपामुद्रा,
फारच छान लेख. खरंच, स्वतःसाठी विशेषतः व्यायामासाठी वेळ काढणे भारतियांना जडच जाते. प्रेरणादायक उदाहरणाने लेख फारच परिणामकारक झाला आहे.

a Sane man said...

changla lekh...sadhya hech vichar chalu astana vachayla miLala...aajpasunach prayatna suru kele pahijet!

HAREKRISHNAJI said...

आत्ता, आजपासुन. आपले खुपखुप आभार आपल्या मार्गदर्शनाबद्द्ल. माझ्यासाठी आवर्जुन लेख लिहील्याबद्द्ल.

अनिल अंबानीचे हे उदाहरण मीच नेहमी दुसऱ्यांना देत असतो , पण मी ही त्त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवुन वजन कमी करायला पाहीजे हे विसरलो होतो. पण आता नाही. नेहमी मी त्याला धावतांना पहात असतो. आमचे एक Director सुद्धा वयाचा ६० व्या वर्षीदेखील रोज १५-२० कि.मी.धावतात.
मी निसर्गौपचाराचा अभ्यास केलेला आहे, काही वर्षापुर्वी उरळीकांचन मधे दोन आठवडॆ राहुन संपुर्ण फिट झालो होतो, पण परत माझ्या मागल्या.

पण फिट व्हायला नक्की काय करायला हवे याची मला कल्पना आहे. एक स्पार्क हवा होता तो आता मिळाला. नैराश्य व त्या मुळे वाढते वजन व वाढलेल्या वजनाने परत नैराश्य , या चक्रातुन आता नक्कीच बाहेर पडीन.

माझ्या कार्यालयात ही एक सुसज्ज जिम आहे, उद्या पासुन परत जायला सुरवात करीन,
नरीमन पॉईंट ते माझे घर यात अंतर ५-६ कि.मी आहे, कधीतरी जे मी चालत घरी यायचो ते आता रोज येईन.

Thanks a million

Vibhavari said...

Khupach chhhan lekh ahe

Ani tumchya blog cha title madhal vakyhi ekdam arthpurn ahe ,Chhan ch!!

Vaishali Hinge said...

thank you... saMgeetaa, sane man,harekrishnaajee,vibhaa..
तुमच्या प्रतीक्रियांनी माझ्या लेखाचे सार्थक झाले..!!!:)

priyadarshan said...

Hold on , सार्थक व्हायला अजुन अवकाश आहे.

मला पण " खुप भुक लागलीये .. काय करु?"

Vaishali Hinge said...

"रोज खुप भुक लागेपर्यत थांबायचे नाही" हा वजन कमी करायचा पहिला नियम . कारण जर असे खुप भुक लागेपर्यन्त थांबलात तर..रोज आपण विचार करतो.. आज.. जाउदे उद्या नक्की डाएट करीन..:)
सो अर्धी प्लेट सॅलेड ने भरुन घ्या बाकी निम्मे हव ते खा.. पण रोज हा नियम पाळा.. बघा कशी जादु होते.

सर्किट said...

जबरदस्त मोटिव्हेटिंग लेख आहे. आणि अंबानींचं उदाहरण तर जबरीच.

ब्लॉगचं टेम्प्लेटही मस्त आहे.

कोहम said...

Hmm....I used to see him running every day. Good on him...

Vaishali Hinge said...

थंक्यु.. वेरी मच. सर्कीट.. for appreciating my blog templet!!!
and koham..!!

Kamini Phadnis Kembhavi said...

tujhe fitness baddalache vichar nehameech aalasaalaa paLavanyaata upayogee tharataat.

ambaanichaa lekha waachalaa mee paN hotaa paN to asaa nanatar aatahvalaa pan nasataa malaa.

thanks :)

Vaishali Hinge said...

thank you shyamali............:)

श्रद्धा कोतवाल said...

लोपा, सही आणि धन्यवाद.

सध्या व्यायाम सुरू केल्याने हा लेख जास्तच प्रेरणादायी वाटला.

(बर्‍याच उशिरा वाचला पण....)

Raj said...

lekha barach ushira vachala. khupach chhan. ambaninchi hi baju mahit navhati.

Abhi said...

फारच छान लिहिले आहे.
-अभी

Anonymous said...

vaishali, anil ambani babat hi baju mahit navhati. it reveals that there is no alternative for hardwork and consistency. fitness kade laksha dyave lagel. In fact this article is motivative to achieve any target in life.