हळुच दरीत मान मोडित,
मटकुन घेई मुरका रानात..
मनकवडी ही निर्झराची ताई,
नदी ठुमकत जाई..
माळेचे मोती खळखळत
काताळातुन झळझळत..
तोर्यात भासे ही ठाई ठाई,
नदी ठुमकत जाई
रानची हिरवी पीरती अन
उधाणलेले तारुण्य,
किनार्याची माया सांभाळुन घेई..
नदी...ठुमकत जाई
रुप लेणं अस देखणं
फ़ुलं पानं माळलेल...
लव्हाळीच्या बटांना वरुण स्पर्शुन जाई
नदी...
स्वतावरच भाळत..
मरुताच्या खळीने अलगद हसत
सार्या गावातुन मिरवुन घेई..
नदी...
तरुची घसट, वृक्षांची लगट
कड्याचा कटाक्ष ,सोडत सारे..
कुणाच्या ओढीने ही एकली जाई..
नदी...
झिळ मिळ जीव तीचा..
गलबल पाही ,
मिटवुन सा-यारेषा..सरीता सागर होई..
नदी ठुमकत जाई..!!!
Sunday, 3 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
आपण कधी नर्मदा नदी पाहीली आहेत का ? महेश्वरजवळ ? तिची आठवण झाली
हर नर्मदे.
नर्मदा , मी लहान असतांना म्हणजे.. चौथीत वैगैरे बघितली आहे..महेश्वर जवळच तेही..!!
खुप सुरेख आहे..
Vaishali...
..khup sundar kavita..
Thank you arvind...........!!!!
Post a Comment