Thursday, 4 December 2008

उत्सव

चेह-यावर तुझ्या पाहिला...
काल भावनांचा उत्सव जाहला

उमलुन रात्र आली
अलवार श्वास झाला..
झरत गेले चांदणे आरपार
दिशा पांघरुन आनंद शहारला
चेह-यावर तुझ्या पाहिला....

असे कढ ओसरले की
खुळ्यागत दिन गहिवरला
दृष्टीत वस्तीस घन निळा आला
त्या निळाईची शपथ तुला
चेह-यावर तुझ्या पाहिला...

धीर अधीर झाला
कायेस मधुर सुर आला..
क्षण तो सारा, ऋतु बदलाचा
हिरवा पिसारा देउन गेला
चेह-यावर तुझ्या पाहिला...

असा साक्षात समोर दिसलास तु
जसा कण कण माझा हरवलेला
निवळत गेला रंग उन्हाचा
अन मनात समीर सरसरला

चेह-यावर तुझ्या पाहिला
काल भावनांचा उत्सव जाहला......

5 comments:

Anonymous said...

very very exellent creation. it has a format of 'marathi gazal' .

Vaishali Hinge said...

Thank you Harish..!!!

HAREKRISHNAJI said...

बहुत खुब, अरे भाई आपणॆ तो कमाल लिया.

HAREKRISHNAJI said...

Where are you ? Sorry to say bat I am back to square one

प्रशांत said...

"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी http://marathi-e-sabha.blogspot.com/ येथील नवीनतम पोस्ट पहा.
सहभागी होण्यास उत्सुक असल्यास shabdabandha@gmail.com ला ईमेलद्वारे लवकरात लवकर संपर्क करा.
धन्यवाद.