Monday, 31 December 2007
Tuesday, 11 December 2007
शिंपल्यातील मोती..
शोधतांना...
डोळ्यांच्या ओलसर कडा
सुकवायला खारा वारा
कमी पडतो तेव्हा
कोमेजलेल्या स्वप्नांना
उराशी कवटाळुन
दोन मुक हुंदक्यांचे
शिंपण घालते,
कधी वाटते त्या भरतीस
करावे नखशिखांत समर्पण,
जावे खोल खोल
त्या गडद अंधार्या पाण्याच्या
गर्भात बुडुन
सोडुन द्यावे अस्तीत्वाशी लढणे
पण..
परत भानावर येउन शोधत राहते किनारा...
मिसळत रक्तात ते खारे पाणी...
माझ्या मातीचा राजा,
नाही त्याच्या कष्टाचा गाजावाजा..
माखली चिंब माय..
त्याच्या रक्ताने,
राजकारण करतो..
त्याचे आम्ही सरावाने!
पोट चिकटले पाठीला..
नाही निसर्ग साथीला..
दोन थेंबासाठी
जीव डोळ्यात झाला गोळा..
तुच सांग देवाजी..,
सोनं पिकवणारा लेक तुझा,
सार्या दुनियेत अनमोल..
का ठरला मातीमोल...
का ठरला मातीमोल..!!!
थेंबा थेंबा साठी
आसुसलेली धरती..
उधी लागलेला
आंबा बांधावरती...,
नजरेच्या टप्प्यात....
नाही कुठे हिरवा सडा..,
फ़क्त कोरड्या मातीचा
मुक तडा...!
पोटच्या पोराचा
घास झाला बियाणे..
रिकाम्या खळ्यात.
गुरांचे कोरड्याने चरणे..
आतुरलेली गिधाडे
आणि काही डोमकावळे..
त्याखाली भिरभिरताहेत
बळिराजाचे चैतन्य
हरवलेले डोळे..!!!
आणि रोज कोसळुन पडतो...
सारे बोचरे तुकडे ते गोळा करते..
हिरवे,निळे, लाल, पिवळे.. आणि चंदेरी
उद्याच्या आशेचे बिलोरी,
सारे असतात काटेरी...
टोचणारे दातेरी!
असे आयुष्याचे झरझर दिवस सरतात,
माझ्यावर जगल्याचे उपकार करतात..
प्रत्येक दिवस माथ्यावर येतो,
उद्या काय म्हणुन त्रास देतो..
प्रत्येक वळणावर ध्येय..
गाठल्याचा भास होतो,
आणि पुढे अजुन न संपणारा रस्ता दिसतो...
न संपणारा रस्ता दिसतो...
गातो पक्षी त्याचीच गाणी..
झुळझुळणारे पाणीसुध्दा बोलते त्याचीच वाणी!
वहाता वहाता ढगही दाखवुन जातो त्याचा चेहरा...
हसते फ़ुल खळी पाडुन... सांगते त्याचीच कहाणी,
माझ्या मनातले हसु ओठावर येते,
फ़ांदीवरची मैना मग धारेवर घेते..,
कधी येणार कधी येणार म्हणुन धिंगाणा घालते
हळुच स्पर्शतो तो घमघमाट मोहराचा,
कुणाचा राग कुणाचा लोभ..
सारे जीवनाचे भोग,
सोडुन द्या सारे
अरे...
वसंत आला रे....!!!
Sunday, 9 December 2007
Thursday, 6 December 2007
चौकटीतली हुरहुर
'सर आजच तुमच्याकडे join झालोय'....
'आधी कुठे होतात?' नेहमीचा प्रश्न विचारत अमरने मान वरही केली नाही, आपल्या समोरच्या कागदांवरुन त्याची नजर जराही इकडे तिकडे गेली नाही. खुप सारे काम रोजचेच असले तरी नविन लोक पण तर येतच असतात.ती पण अशीच ’नविन’ आली होती.
’छ्या..! का आला हा विचार माझ्या मनात’, अमरने मान झटकली.
'नासिक!' त्या मुलाने उत्तर दिले.
गावाचे नाव ऐकल्याबरोबर अमरच्या हातातला पेन तसाच थांबला... डोळ्यापुढे फ़ुललेला मोगरा तरळुन गेला, काही कळायच्या आत एक गोड शिरशिरी नखशिखांत धावली. वातावरणात अनामिक सुगंध पसरला... हळवं की काय म्हणतात तसं वाटु लागलं.. खिडकीबाहेरच्या आंब्याचा मोहर मनात फ़ुलुन लाजु लागला... आतल्या आत कोकिळाही गातांना ऐकु येउ लागली.... की मन गाउ लागले.. ? ती भेटेपर्य्न्त गिष्माचा दाह कळला होता ती भेटल्यावर वसंताचे फ़ुलणे काय असते ते कळले.
नकळत त्याने त्या अनुभुतीला काळ वेळाचे भान विसरत स्वत:ला स्वाधिन केले..... हलकेच डोळे मिटले क्षणभर.... अस्तीत्व विसरुन...!
'सर'...
अमर भानावर आला. कानशिले तापली होती. हृदयात खोल आत कुठेतरी त्याला अस्वस्थ वाटले 'अजुन मी तसाच आहे, इतका प्रयत्न केला पण नुसते तीच्या गावाचे नाव कानावर पडले तरी असं... भोवतालचे जग पुन्हा उमलुन आले...'
'सर, मी तसा अर्ज दिलाय आज join झालो म्हणुन.
अमरने नुसतेच 'हो हो' केले. अस्वस्थ्पणे त्याने समोरचा PC सुरु करण्याचा प्रय्त्न केला.तो सुरु होत नाहिये पाहुन रागाने अन जोरात आवाज दिला
'कोण आहे रे तिकडे जरा पंखा लाव की..'
'साहेब, light नाहियेत' शिपायाने येउन सांगितले.
अमर अजुन अस्वस्थ झाला.. "ह्म्म मघापासुन आपणच तर म्हणतोय आज दिवसभर light येणार नहियेत आणि पुन्हा विसरलो...आज आठवणिंचे मळभ असेच राहणर वाटत ..’ त्याने कुठलेही विचार अडवले नाही.प्रयत्न करुन उपयोग नव्हता . तीची आठवण अशीच होती तीच्यासारखीच.. जा सांगुनही ऐकल नसत तीने आज.
"साल हे काय झाल, ही अस्वस्थता, अगदी तश्शीच.. 'ती' भेटल्यापासुन च सुरु झाली. नक्किच... तोवर अगदी चांगला होतो, अगदी normal .. आणि आता नुसत्या आठवणीनही.. सालं प्रेम बिम अस काही असत यावर विश्वास च नव्हता. विश्वास नव्हता म्हणण्यापेक्षा कधी आस पास पाहिलं देखिल नव्हते. कोलेजात सिनेमा बघायचो की खुप.. पण ते जग वेगळे आहे आणि आपले वेगळे अस वाटायचे,... वाटायचे कसले होतच तसं वेगवेगळ. साल कोलेजात कुठल्या पोरीवर लाईन माेरायची पण हिम्मत झाली नाही. आपल्याला कोलेज मध्ये शिकायला मिळाले हे च खुप झाले वाटायचे..... वाटायचे कसले होतेच तसं! शिकुन नोकरी करायची मग काकु लग्न कर असा लकडा लावेल तेव्हा लग्न करुन मोकळं व्ह्यायचे. एव्ह्ढ्याच चौकटीत आयुष्य असतं, हा समज पक्का होता. आणि तात्यांना तर माहितही नसायच मी कुठल्या इयत्तेत आहे म्हणुन. काकु बिचारी घरात सगळ्यात लहान, कामावरच असायची,... शेतात जायची, काकांची पोरं आईला काकु म्हणायचे, मी पण काकुच म्हणायला लागलो.. वडलांना सगळे तात्या म्हणाय्चे मी सुध्दा तेच म्हणायला लागलो..त्या भल्या मोठ्या बारदानात कुणाला कुणाचा पायपोस नसायचा.
१२ वीला ९२ टक्के पडले. काकुला त्यातले फ़क्त ’पास्” एव्हढेच कळले... . संभा आला म्हणला 'चल आपण दोघ agri ला जाउत, आपल्याला नक्कि admission मिळेल अस माझा भाउ म्हणालाय, मागची admission ८०% ला close झाली होती.'... 'फ़क्त थोडी जमिन नावावर लागते म्हणाला. काकां लोकांनी फ़ीला पैसे दिले/पुढे देत राहिले.. शिकायच शिक पण तुकडा बिकडा ना्वावर होणार नाही म्हणालेत.
तेव्हा काकु सासरी आल्यापासुन पहिल्यांदा माहेरी गेली. भावाकडुन माझ्या नावावर काही एकर शेत करुन आली. माझी admission झाली. . मामाकडुन आल्यावर तीचा कसानुसा झालेला चेहरा अजुन आठवतो. गलबलुन आलं पोटात पण काय झाले विचारयची हिम्मत झाली नाही..
कोलेजला सगळेच आम्ही फ़किर...! agriculture होते ते!MBA नाही. सगळीच शेतक-याची मुलं. नोकरीशिवाय कसली स्वप्न सुध्दा कधी पडली नाहीत.
सालं पुढची फ़ी कशी भरायची याचीच चिंता सगळ्यांना असाय्ची! पायात एक स्लिपरचा जोड नाहितर आपली कोल्हापुरी..!, ती तुटल्यावर दुसरा जोड!
दोन शर्ट धुवुन धुवुन वापराय्चे...! मेस् वाल्याला लुटुन खाल्ले होते सगळ्या पोरांनी. सिनेमाला पुढे बसाय्चे,सगळ्यात कमी तिकिटात आणि मग मात्र हीsss मस्ती कराय्चो.. आणि आयुष्याच्या चौकटीत रंग भरायचा प्रयत्न करायचो..तारुण्याची मस्ती होती.
सगळी जण रात्री रूमवर आलो की चिडेचुप शांतता व्हायची, अभ्यासाला लागायचो.. मग रात्रभर अभ्यास.. टपरीवाला जागा असतो हे माहित असायचे. कधीतरी मध्यरात्री मधुनच चहा प्यायला जायचे. रमत गमत.... दोन चार विषयावर तीथेच चर्चा करत बसाय्चो..! आकाशातल्या चांदण्या फ़िक्क्ट व्हायच्या अन तांबडं फ़ुटता फ़ुटता आमचे वाद रंगात यायचेत. पीरेडला जाणारे scooter वरचे सर दिसले की तसच धावत classroom गाठायचे... अग्रि ग्रजुएट्ला कसली आलिये नोकरी? मग परिक्षा दिल्यात. एक दिवस संभा धावत आला. ’ही यादी बघ !’ दोन नावं ठळक पणे वाचाली.. १. संभाजी...दुसरे अमर...
नोकरी लागली. अजुन काही रंग आलेत आयुश्याच्या चौकटीत.. जे कपडयांचे रंग दुकानाच्या काचेच्या चौकटीत दिसायचेत, ते रंग माझ्या घरातल्या कपाटात दिसु लागले.कधी त्याचा पुर्वी हेवा वाटला नव्हता. तेव्हढा वेळही नसायचा विचार करायला पण ग्रिष्म सोसत असलेल्या उभ्या भेगा पहिल्या पावसाच्या सरीने थोड्याफ़र का होइना बुजल्या जातात तसे झाले होते. आणि जगाने सलाम केला की कसे बरे वाटते.
दुख-या जखमा भरुन निघाल्याचे भाव काकुच्या डोळ्यात दिसले.तिच्या भिजलेल्या पदराची कडा दोन चिमटीत धरुन तसाच हात तीने माझ्या गालाला टेकवला.ओल्या पदराचा गार स्पर्श माझ्या ह्रुदयलाही गारवा देउन गेला.
नोकरी सुरु झाली. जगाच्या पलिकडच्या बाजुला होतो आजपर्यंत, सत्ता ,पैसा समोर आणि त्या विरुध्द मी. आता या जगाच्या दुस-या बाजुकडे मी आलो होतो. ही बाजु पण मजेशिर होती जीवनाची!!! पलिकडे होतो तेव्हा हेवा कधी वाटला नव्हता. आणि अलिकडे येउनही त्याची रग चढली नाही. जसा होतो तसाच राहिलो. थोडा फ़ार बद्ल तर होणारच होता. रोज उठुन अन्याय ,संताप,लबाडी,फ़सवणुक, आप्तांवरचे दावे.. सगळं सगळं बघुन सरावाने मी ही ते शब्द भावना सोडुन वाचायला शिकलो. आणि वापरायलाही लागलो.
त्या दिवशी असाच धो धो पाउस पडुन गेल्या्वर ओलाव्यावर पहुडलेल ओलं कोवळ उन माझ्या केबिनच्या काचेवर टीचक्या मारत होतं. त्या बिचा-याला buildings च्या पसा-यात मोकळेपणे हात पाय ही हलवता येत नव्हते. वस्तीवर कस घासाच्या जांभळ्या फ़ुलांवर उन बिनदिक्कत खेळत असायचे.... न लाजता.. अंग न चोरता.., वा-याच्या संगतीने, कोकिळेच्या कंठाने... कैरीच्या गंधाने!!"
विचार करता करता अमर थबकला. समोर आजच्या सारखे त्या दिवशी सुध्दा कुणीतरी उभे होते. त्याने पुन्हा तो प्रसंग आठवायला सुरवात केली.
’ सर मी आज पासुन join होतेय तुमच्या department ला’ समोरच्या निरागस नितळ चे्ह-रावर अवघडल्याचे भाव होते.
अमर ने वर बघितले, आणि बघतच राहिला.
’दाखल तारिख देताय ना सर’... अवघडलेला चेहरा आता अजुनच गोंधळला होता.
’ह’ म्हणत त्याने पटकन short sign मारली.
आता तो चेहरा दारातल्या बहरलेल्या मोग-यासारखा रोजच दिसु लागला. सोबतीने मीटींगला बसु लागला. व्हिजीट्ला सोबत करु लागला. कुठेही निघतांना अमर आधी गाडीच्या मागल्या बजुला बघायचा,ती गडबडीने येउन बसतांना दिसली की मग हलकेच गालात लपलेल हसु ओठात येउन सांडु नये याची त्याला काळजी घ्यावी लागायची..! तीच्या काही प्रश्नानी खुप हसायला यायचे त्याला, तेव्हा ती गडबडुन जायची मग बराच वेळ गप्प आपले काम करत बसुन असायची मग अमरच काहि तरी विषय काढुन तीला बोलते करायचा, कधी तीच्या बावळट भोळेपणात त्याला वाटायचे, कसं होणार हीचे इथे... या असल्या जगात!
ब-याचदा ती धिट्पणे अमर बोलत असतांना त्याच्याकडे बघत असायची पण अशा वेळी अमरला नजरेला नजर देण होत नसे, गडबडुन तो दुसरीकडे बघु लागे. नंतर आठवुन त्याला स्वताचे अश्चर्य वाटे. स्वताला आरश्यात न्याहळत तो म्हणायचा "मी बदललोय! एक वेगळी चमक त्याच्या डोळ्यात ठाण मांडून बसलेली आहे असे त्याला वाटे. तो चेहरा समोर दिसला ना्ही की त्या गंधाच्या आठवणी न अमर बेजार होवु लागायचा..डोळे मिटले की फ़ुल उमलावे तसा तो चेहरा नजरे समोर येवु लागला त्याचा.
हा नव्याने जाणवलेला रंग होता, आवडुन गेला अमरला. तो खुष राहु लागला.या रंगाने स्वताचे नवे विश्व रंगवु लागला.
रोजच्या त्या धबाडग्यात त्याला आता गाडीच्या ’खडबड.. खडबड ’ मध्ये, केसच्या फ़ाइल मध्ये, मोर्चाच्या निषेधाच्या घोषणातही मधुर सुर जाणवु लागले. काल मीटींगमध्ये S.P.म्हणालेसुध्दा ’काय रे फ़ार खुष असतोस हल्ली. anything special !’
त्याने हसुन नुसतीच मान हलवत'Nothing' म्हटलं.पण सगळ्यांना कळल होते तो हल्लि खुष असतो म्हणुन.
संभानेही विचारले होते की ’काय रे कुठल्या विश्वात वावरतोय सध्या!’
ती समोर कागद धरुन बसली होती मघापासुन. जवळ अनु येउन उभी राहिली तरी तीचे लक्ष गेले नाही.
"काय बाई, फ़ार्रर्च sincerely काम करतेस? मी पण आहे ह तुझ्याच जवळच्या department ला.! एव्हढे या आकड्यातत बघण्यासारखे काये?"अनु टोमणे मारीत होती!
अनुने खसक्न कागद ओढला तीच्या हातातुन ! ह्म्म वसुलीची महिती करुन घेतेय वाटत्ये!
’ह्...’ तीने नुसताच हुंकार भरला.
" का ग बये , बोल की काहीतरी!तु ना हल्लि वेगळीच झलियेस बघ.. " अनुचा mobile वाजला . म्हणून बर झालं. ती फोनवर गप्पा मारु लागली.
अनुला काय माहित ती काय बघत होती त्या कागदावर. तीथे होती त्याची सही.. "अमर....." कीती साधी सरळ सही त्याच्यासारखीच! म्हणनात ना ज्याची सही साधी ,सरळ वाचता येण्यासारखी असते त्याचा स्वभावही सह्ज वाचता येतो . म्हणुनच तर तीला त्याचा चेह-र्यावरचे सगळे काही वाचता यायचे..!
ती सारखी बघतेय लक्षात येउन तो इकडेतिकडे नजर भिरभिरवायचा. तीला हसु यायचे! काय हे? याने का लाजावे ? अरेच्च्या, सहज नजर भिडली तरी याने लगेच दुसरी कडे बघावे . कठिणच आहे. आणि मी पण का सतत त्याच्याकडे बघुन त्याची अशी फ़िरकी घेते? ती पण एखाद्या लाजलेल्या कळीसारखी स्वत:शीच हसा्यची.
तीला लक्षाता आले होते,एक अनावर असुसलेपण जाणवतय तो भेटल्यापासुन, फ़क्त त्याला बघत राहण्याची आस..! जग संपलं तरी चालेल आता.... असा विचार करायची.
संध्या्काळ झाली तर तीच्या काळ्याभो्र डोळ्यात चंद्रच खुलायचा.
मधुनच पुढे काय होइल हे कातर कोवळे पण तीला अस्वस्थ करायचे. एव्ह्धी ओढ...का?! दिस्ला नाही तर इतके अस्वस्थ व्हावे?
परवा तो त्याच्या केबिन मध्ये नव्हता. बाहेर कसली तरी गर्दी होती.
नक्किच तो तीथे लो्कांना समजावत उभा असणार. ती ही जाउन उभी राहिली.... त्याला शोधत.. गर्दीत त्याचा चेहरा शोधतांना त्याच्या त्या हस-या निरागस नजरेने लगेच पकडले तीला, बघत राहिला तीच्याकडे, !!
त्याची ती थेट आत उतरत जाणारी नजर..नखशिखांत रोमांच उभे राहिले तीच्या अंगावर,
त्याला शोधणारी तीची नजर त्याने अलगद झेलली आणि ती तशीच्या तशी स्वता:च्या त्या निरागस हास्यात लपेटुन परत केली.. तेव्हा थिजल्यासारखी ती तीथेच उभी राहिली .. त्या गर्दीत office च्या आवारात.
शेजारी अनु येउन उभी राहिली होती.. तेव्हा तीने डोळे मिचकवल्याचा भास तीला झाला. अजुन दोन तीन जण तीच्या कडे बघताहेत असा भास झाला. ती मनात म्हणाली
"जाउदे , मला काही ही फ़रक पडत नाहिये" .
त्याच्या प्रत्येक हलाचालितुन, त्याच्या दिसण्यातुन , त्याच्या हसण्यातुन तीला तीच जाणवत होती. त्याचा चेहरा काही ही लपवुच शकत नव्हता ,तीची नजर त्याच्या चेह-यावरचे एक एक बदल झटकन टिपत होती .. तो एक छंदच लागला होता तीला. तो इतरांशी बोलतांना त्याला पाहणे.. हे तर थरथरत्या लाटेने तळ्यात पडलेले आकाशाचे प्रतीबिंब निरखावे तसे वाटायचे
आणि एक अवखळ हसु कायम असायचे त्याच्या चेह-यावार, कधी उदास दिसला नाही. नेहमी त्या वा-याच्या झुळकीसारखा मंद सुगंधावर विहरत असायचा..
घरी दारी तीला त्याची ती अवखळ मुद्रा आठ्वत रहाय्ची.
आता तीला हाताखालच्या माणसांनी चुका केल्या तरी राग यायचा नाही. रिख्शावाल्याने जास्त पैसे मागितले तरी ती अजिबात डोकं लावत नसे. आईने जेवुन जा ग म्हटल्यावर ती चिडायची नाही. अनुच्या बडबडीला कंटाळायची नाही. कुठल्याच कामाने वैतागायची नाही.
एके दिवशी अचानक सकाळी त्याच निराग्स mood मध्ये बसलेली असतांना वर्तमान पत्राच्या आतल्या बतमीवर नजर जाताच , ती चपापली," मला कसे कळले नाही?" ती धावत office मध्ये आली. तीने P.A ला विचारले."साहेबांच्या बदलीची बतमी वाचली खरय का?" तो "हो" म्हणाला..
पुढे बोलत राहिला "असच असते इथे अचानक बदल्या होतात. साहेबांना पण माहित नव्हते. वैगैरे ...." पण तीने... बोलायचा प्रयेत्न केला नाही.
सरळ "त्याचा” mobile number फ़िरवला. दुसर काहीही तीला सुचल नाही. त्याच्याभोवती लोकाचा गराडा असावा , खुप कल कल ऐकु येत होती.. त्याने फ़ार काही न बोलता " हो बदली झाली . भंडा-याला चाललोय डोंगर तळी फ़िरायला.. म्हणुन सांगितले". आवाजात तेच ते त्याचे हसु.
काही फ़रक पडला नाहिये त्याला. त्याच्या हसण्यातुन जाणवतेय ना.. ती मनाशीच म्हनाली.
त्याच्या मनात नक्कि काय असेल? तीची चल बिचल तीला स्वस्थ बसु देत नव्हती.
पाकळी पाकळीत नजाकतीने जसा मोगरा भर उन्हात फ़ुलत जातो तसे तीचे भाव विश्व फ़ुलत होते रोज!!आणि अजुन तर संकोचाचे धुके दुर व्हायचे होते. आणि लगेच अंधारुन आले !! तीचे डोळे डबडबले..........
पावसाची छोटीशीच सर आली तरी एव्हढे का भिजुन गेलो आपण ?एकमेकांना काही सांगाय्च्या आत.. असा कसा ऋतु बदलला ?
दारातल्या ज्या कोवळ्या पाना फ़ुलांशी तीची मैत्री झाली होती . त्यांचा रस्त्यात डोकावण्याचा आता तीला राग येउ लागला होता .गेट पाशी आलेली बोगन वेलीची फ़ांदी तीने रागाने बाजुला केली. घरात गेल्यावर आईने प्रेमाने विचारले "जेवतेस ना.. वाढु?"
तीने संतापाने म्हटले "जेवणशिवाय तुला सुचते की नाही दुसरे?"
ती खोलीत जाउन पडली, रोज या वेळी रोजच्या नजरेच्या गुणाकार भागाकाराची पुन्हा उजळणी व्हायची. आज त्यातले काहीच झाले नाही
आज संभाला रात्री जेवतांना सांगुनच टाकले शेवटी अमरने.... तो हसत सुटला! "गपरे"..बाकी अमरला त्याची ही प्रतीक्रिया अपेक्षीत होती !!! म्हणाला " माझ्या आले होते लक्षात , तु सांगाय्ची वाट पहात होतो..!"
"मस्त गड्या , बाकी काहीही असो, तुझ्या्त झालेला बद्ल आपल्याला आवडला, तीला मानावे लागेल."
दुस-या दिवशी खरेद्दीला बाहेर पडल्यावर शर्ट घेतांना संभाने दोन उचलले."हा घे peach नाहीतर हा ओफ़ व्हाईट."
अमर ने एक लेमन यलो आणि एक ब्लु तो ही इन्क ब्लु उचलला. तीचे याच तर रंगाचे ड्रेस असतात.
संभा काय समजायचे ते समजला .गालात हसत दोघे बाहेर पडले.त्या रात्री अमरने ठरवले. लवकर तीला आपल्या छोट्याशा आयुश्यात आणायचे. जगण्यासारखे खुप काही आहे असे त्याला वाटु लागले.
अचानक बदलीचा fax आला. "जावे लागले तरी काय हरकत आहे. कायमचे थोडेच सोडुन जातोय. हे अस तर नेहमी चालु राहणारे." अमर मनाशी म्हणाला " आणि तुझी नजर तर माझ्यासोबतच आहे.. माझ्या पापण्यात बंद"
त्याने ओफ़्फ़िसला फोन केला. तीच्याशी बोलणे झाले just formal.त्यालाही एकदम फोनवर काय बोलावे सुचले नाही. पुन्हा फोन झाले नुसतेच. काहीतरी कारणे काढलेली...... बोलण नव्हतच ते पुन्हा पुन्हा ती भेटण्याचे उर्मी ,आस होती. नुसतेच श्वास आणि एकमेकांना भेटल्याचे भास..! रात्री अभाळात बघत तो विचार करी .. बस एक तुकडाच तर हवाय , जो माझा असेल फ़क्त माझा..माझं आकाश असेल ते , त्याबरो्बर पानांची सळसळ होई.. मन आभाळा होवुन तीला भेटुन येई.!
"या आठवड्यात घरी जावे..... काकुला सगळ काही सांगुन टाकावे ... अन तीला जावुन भॆटुन विचारावे, रागवली असेल बहुतेक पण अह.. तीला माझा कधी राग येतच नव्हता जसा मला तीचा राग कधीच येत नाही. !" त्याने ठरवुन टाकले.
तो घरी पोहचत नाही तोवर भेटणा-यांची रिघच लागली. काकुने येतोय म्हणुन गावभर सांगुन ठेवले ना.. काकुंना बघताच क्षणी अमरला त्यांचा चेहरा उजळलेला वाटला , मायेनेही आणि सुखाच्या सावलीनेही... . त्याने जातांना स्पष्ट बजावले होते माझ्यसोबत बदलिच्या गावी चल नाहितर इथे आता काम वैगैरे करायचे नाही. लहाणपणी काकु त्याला सारखी "माझ्यवर पडला की गोरा गोमटा लेक माझा " अस म्हणायची ! अमरला आता त्याला अर्थ कळला होता. काकु खरच गोरी होती पन आयुष्यात आलेल्या टळटळीत दुपारीने तीचा रंग रापला होता. रात्री काकु आणि अमर बाजेवर अंगणात बसले. आकाशात चांन्दण नव्हते. नुसतेच निरभ्र आभाळ.. स्वच्छ..! काकुने गप्पा गप्पात सांगितले "उद्या तुझा मामा येणारे ! त्याला वाटते सोयरिक व्हावी तुझी आणि त्याच्या लेकीची!, माहेर परत जोडले जातेय माझं...!! गरिबाघरी आली तशी माहेर सुटले होते. आज भाग्य दिले तु मला ते पुन्हा जोडायचे...!! चुकला तो! काय करतो भाउ आहे शेवटी, आता देवाने त्याला सद् बुध्दी दिली म्हणुन आपल्या दाराशी नातं जोडाया आलाय! मोठ्या बहिणिच्या मनान माफ़ करती त्याला... " अमरने पाहिले काकुंच्या डोळ्यात चांदणं चमचमत होते. त्या डोळ्यात इतके समाधान कधीही नव्हते दिसले.नेहमी चे ते कोरडे ठक डोळे आज चांदणं घेउन नाचत होते. त्यात थोडीसुध्दा जागा नव्हती कशालाच..!आणि त्या चांदण फ़ुलांकडे बघुन त्याला दुस-या कुठल्याही नजरेची त्यावेळी आठवण झाली नाही. त्याने लग्नाला होकार दिला.
आज office ला जायला निघाल्यावर ती स्वताहुन आरशात डोकावली.कदाचित ड्रेस्च्या रंगामुळे असेल... एव्हढे मात्र खरे की तीला आरशात बघावेसे वाटले खुप दिवसांनी. कानत छोटेसे हि-याचे टॉप्स.अंगावर या व्यतीरिक्त दुसरा दागिना नव्ह्ता पण तीच्या चेह-र्याला सुंदर दिसायला अजुन कुठल्या दागिन्याची गरजही नव्हती. गरज होती ती फ़क्त एका सुंदरशा खळाळत्या हास्याची.
ड्रेसच्या लेमन येलो कलर कडे पाहुन ती हसली. अनु नी आणि तीनी पैज लावली होती ’ रोज एकाच रंगाचा ड्रेस घालुन दाखवायचा.दोघी मस्ती करत अशा काहीही वाटेल त्या पैजा तर रोजच लावायच्या.. "तो पण ना वेडाच होता..त्याला वाटले मला हा रंग आवडतो मग तो ही... आणि मलाही नंतर हा रंग आवडायला लागला होता... जाउदे वेळ होतोय.." ती आरशापासुन बाजुला झाली.कामाची फ़ाईल उचलली , आईला बाय केला अन निघाली.
डोहातली खळ्बळ आता शांत झाली होती. आठवणींच्या झुळकीने कधी कधी तरंग उठायचे एव्हढेच. मागच्या काही दिवसात तीने ऐकले होते त्याचे एका आमदाराच्या मुलीशी लग्न ठरले. .अनु म्हणत होती त्याच्याच नात्यातली मुलगी आहे. म्हणजे तर आधीपासुनच ओळख असणार? का विचार करतोय आपण ..विचारातच ती तीच्या साहेबांच्या केबिन पाशी आली. दार लोटले आणि आत .."तो" बसला होता.. तसाच जसा पुर्वी बसायचा ’थोडेसे विसकटलेले केस,रुंद कपाळ,धारदार नाक,प्रचंड सुंदर हसु !"प्रसन्न" अजुन काय असते.... याच्या कडे पाहुनच हा शब्द तयार झाला असावा.. असे तीला नेहमी वाटाय्चे इतके कसे "प्रसन्न" राहु शकते कुणी? पण ते gracefull smile आज ऒठाच्या कोप-यातुन हरवल होतं. काही न सुचुन नुसती नजर भेट होवुन ती बाहेर निघुन आली. हाता पा्यात त्राण नाही राहिले आणि घशाला कोरड पडली आहे असे तीला वाटले..
P.A. म्हणाला "मॅम, जुने साहेब आलेत, आज त्यांची कोर्टाची तारीख होती इथे. भॆटला की नाही तुम्ही?."
" हो भेटलेकी ", ब-याच वेळानी तीच्या तोंडुन आवाज फ़ुटला...!
तीला वाटले अजुनही त्याचा मला राग येत नाहिये.
आज पुन्हा तेव्हढ्या काही सेकंदात त्याचा चेहरा तीने पुन्हा वाचला... तीला वाटले " पहिल्या प्रेमाचा अंकुर करपला होता तरी आशेचे बीज डोळ्यात तसच होते...!!!
रोज सकाळी धुक्यात धुरसट झालेले छोटे तळे खिडकीतुन दिसायचे, आता हिवाळा सुरु होत होता. पानगळीने सारे रान निष्प्रान काष्ट बनत होते. बदलत्या ऋतु पुढे प्रत्येकालाच मान तुकवावी लगते ना? अमर नुसताच मघा पासुन खिडकीत उभा होता. घरासमोरच्या बागेत सकाळी सकाळी मानेवर तपकिरी सोनेरी पिसे असलेली भारद्वाजाची स्वारी चक्कर मारायला यायची.., पक्ष्यांची किलबिल गाणी ऐकु यायची.. मन "प्रसन्न" ्व्हाय्चे .पण एक आठवणीची सर येउनच जायची. काकु ला जर भारद्वाज दिसला तर काकु म्हणायची "आजचा दिवस भाग्याचा आहे." office ला निघतांना त्याने काकुला फोन केला. "इकडे येउन रहा म्हणुन गळ घातली.. इथे रोज भारद्वाज दिसतो म्हणु्नही सांगितले.!" त्याला वाटत होते काकु इथे येउन राहिल तर ही अस्वस्थता कमी होईल. मन लागेल.
एकदा तीला भेटावे असे अमरला फ़ार वाटले, आता केसला गेलो तेव्हा दिसली होती तेव्हा तो म्लान चेहरा पाहुन त्याला कससच झाले. वाटले कित्येक दिवसात हसली सुध्दा नसेल.पण तो निग्रहाने बोलला नाही. आपण तीचे आयुष्य का थांबवुन घ्यावे? आणि आपले ही? कधी कामा व्यतीरिक्त एकमेकांशी बोललो नाही की भेटलो नाही.
तो तयार होण्यासाठी bedroom मध्ये गेला. त्याच्या हातात सगळे तेच रंग येत होते... त्याने कपाटातुन "त्या खास" रंगांचे सगळे शर्ट काढले.आणि डस्ट बीन मध्ये टाकुन दिले. एकदा विसरायचे ठरवले ना ...!! त्याने पाढरा शर्ट घातला आणि घराबाहेर पडला.त्याच्या नेहमीच्या वेळी ड्रायव्हर ने गाडी दारात आणुन उभी केली होती.
तो गाडी पर्यन्त जाई तोवर त्याचा "विसरण्याचा निश्चय टिकला" गाडीत बसल्यावर तो ड्रायव्हर ला थांब म्हणाला. तो परत आलेला पाहुन ओर्डरलीने घाईने दार उघडले. तो bedroom मध्ये गेला "ते" सगळे रंग डस्ट्बीन मध्ये तसेच पडुन होते.
त्याने सगळे शर्ट परत उचलता उचलता आपल्या "मनाला" म्हटले. " थोडी अजुन मुदत दे मला विसरायला..!"
त्याने ते सगळे रंग पुन्हा नीट घडी करुन कपाटातल्या आतल्या कप्प्यात ठेवुन दिले.
शरीर मनात त्राण येउ लागले नी लगेच वसंत संपला असे त्याला वाटत होते. त्या वसंत ऋतुशी "संवाद" नाही साधला तेच बरे झाले. नाहीतर त्याला भेटण्यासाठी सर्वस्व पणाला लागले असते. त्या पेक्षा त्याकडे पाठ फ़िरवण्याची किंम्मत नक्किच कमी असेल.
स्वता:चे अत्यंत प्रिय असे काही जीवनात सोडुन देण्याची वेळ प्रत्येकावरच येते का? माहित नाही. पण काकुवर आली होती. तीला माहेर सोडावे लागले होते. आज तीच्या नशिबाने ते मिळते आहे तर का मी मध्ये यावे?
रात्री बराच उशिर झाला सगळी कामे आटोपुन घरी जायला. घरी पोहचतो तो दारात संभाची गाडी दिसली. तो असा अचानक आडवारी का आला असेल हे पाहुन त्याला अश्चर्य वाटले नाही अन कळायला वेळही लागला नाही. संभा सोफ़्यावर पाय पसरुन बसला होता. अमरच्या येण्याने त्याच्या T.V. बघण्यात थोडाही व्यत्यय आला नाही. शिपायाने येउन विचारले,"साहेब, जेवणार का ?"
अमरने संभाकडे प्रश्नारथक पाहिले. तो खांदे उडवत काही न बोलता जेवायला बसला. शांतपणे दोघांत एक शब्दाचेही बोलणे न होता जेवण संपले. घरातल्या नोकरांची पांगापांग झाली.
संभा अमरकडे एक टक बघत होता. अस्वस्थ होवुन अमर त्याच्यावर डाफ़रला "हे ,हे, अस काय लावलय? हे बघ, काय बोलायचे ते नीट बोल ना ..!" अमरच्या टिपेला पोहचलेल्या आवाजाचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो तितक्याच थंडपणे अमरसमोर येउन उभा राहिला हाताची घडी घातली.
"नाही , मघापास्न विचार करत होतो, तुझे पाय धरावे की हा पेपरवेट तुझ्या डोक्यात घालावा...,मी बोलण्यासाठीच इथे आलोय, बोलण्याने सगळे problem solve होतात या मताचा मी आहे हे तुला माहित नाही? एका शब्दाने काकुला बोलला असता तर बिघडले असते का तुझे? आई आहे तीने समजुन नसते का घेतले?...."
अमरने त्याला पुढे बोलु दिले नाही, त्याच्या कपाळावरची शिर तडतड उडु लागली.."कीती सहज पणे म्हणालास ना तीने समजुन घेतले असते,... घेतले असते ना तीने १०१% समजुन घेतले असते.. कीती गृहीत धरुन चालतो ना आपण आई आहे ’ती’ तीने समजुन घ्यावे..., तीने समजुन घ्यावे मुलाला त्याच्या सुखाला..
लग्नानतर ती श्रिमंत घरातली लेक या ’बडा घर पोकळ वास्यात’ रहायला आली तेव्हा ही .तीच्या सासरच्यांनी हेच गृहित धरले तीने समजुन घ्यावे या गरीबिला ,तीच्या नवर्याने गृहित धरले.. तीने समजुन घ्यावे त्याच्या विक्षिप्त स्वभावाला, आई वडिल गेल्यावर भावाने कधी सुखदुख:त विचारले नाही, तेव्हाही तीने दोघातली ’दरी’ समजुन घेतली... कीती जणांना तीने समजुन घ्याचे? आणि मी एखादी गोष्ट समजुन घेतली तर कुठे बिघडले?
अरे त्या दिवशी ती इतकी खुष होती सगळ्या नातेवाईकांना भेटण्यात.. कित्येक वर्षानंतर!.. तीला लक्षात ही आले नाही की भावाने दुस-या दिवशी भेटायला येतो सांगुन कार्यक्रमच ठरवला, कारण त्याला मुलीचे लग्न करायची घाई होती , बहिणिशी नाते जोडायची नाही. ..पण त्या भाबडीला हे सुध्दा कळले नाही."
त्यात "हे नाते" त्याच्या चेह-रावर बोलण्यात, वागण्यात मला तर कुठेच दिसत नव्हते.त्याच्यासाठी मी फ़क्त होणारा ’जावई’ होतो. एका सत्ताधा-याला हाताखाली एक हक्कचा माणुस हवाय त्यांना बाकि काही नाही."
संभा गाडीच्या चाव्या हातात फ़िरवत उठुन उभा राहिला.. "तुझ्या कडे मला solution सापडेल याची खात्री होती, तु बोलतो राव चांगलं.. काये तु कधी कधी असा गाढव बनतो ना..!"
"म्हणजे??"
"निघालो मी?"
"तु कुठे जाणारेस आता?"
"साहेब ," नाटकीपणाने संभाने हात जोडले.. "येतो आता , मी काय नोकरी सोडली की सरकारने मला नोकरीवरुन काढुन टाकलय? तुला उद्या office आहे आणि मला नाही काय?तिकडं पोहचत उद्याची संध्याकाळ उजाडायची.. तुझा गुंता तु सोडव .. राम राम..येतो मी!
बाहेर येउन त्याने ड्रायव्हरला आवाज दिला आणि गाडीत जाउन बसला.
गोंधळलेल्या अमरला तसेच ठेउन वळुनही न बघता त्याची गाडी वळणावरुन दिसेनासी झाली.
रात्रीच्या अंधारात अमरला त्याचे एकाकीपण जास्तच जाणवु लागले.दोन एक दिवसात काकुला बोलवुनच घ्यायचे म्हणुन
दुस-या दिवशी रात्री काम संपुन निवांत झाल्यावर त्याने घरी फोन लावला.
पलिकडुन गड्याने फोन उचलला.
" सगळे आत बोलत बसलेत व्हय , तो संभादादा आलाय ना मघापास्न..!!"
"हळु बोल, मी बहिरा नाहिय..!" अमर इकडुन ओरडला.आणि ऐकुन त्याची फोनवरची पकड घट्ट्ट झाली तो उठुन उभा राहिला.
" कधी आला तो तीकडे"
" हे काय ,सांज होता होताच पोचले की.."
" जोरात बोल की जरा घशात अडकल्यासारख काय बोलतोय.. काहिच ऐकु येत नाहिये, बोलव की आता त्याला फो्नवर , नुसता गप्प काय बसलास...!"
"होय, जी..!"
"संभा हे काये?.. काये हे? तु म्हणला होतास..."
"मी खोटे बोललो.." जितका अमर चिडुन बोलत होता तितक्याच थंडपणे त्याने उत्तर दिले.
"म्हणजे तु..."
त्याच शांत आवजात त्याने परत सुरु केले.."आपली शंका रास्त आहे आणि आपला संशयही खरा आहे मी काकुशी खुप काही बोललो आहे आणि ती पण माझ्याशी बोलली आहे. साहेब, बोलल्याने जगातले सगळे problem solve होतात असे माझे अजुनही मत आहे... आता तुझी माझ्याशी बोलायची इच्छा नसेल हे माझ्या लक्षात आले असल्याने मी फोन आपल्या मातोश्रीं कडे देतो.."
अलिकडुन फोनवर शांतता पसरली..
"बेटा, आईला जोखायला फ़ार छोटी फ़ुट्पट्टी आणलीस तु?.. काकुचा कापरा आवाज फोन्भर घुमला... "जे मी तुला देतेय,देत आलीये ते माझे नाहिये पोरा.. ते माझ्या आईबापांनी तुला द्यायला दिलेला ’वसा’आहे. माझ्या जन्माची ही तिन्ही सांज, केव्हा अंधार पसरेल सांगता नाही यायचे. तुला अजुन इथे रुजायचय,दिवस जायचाय तुझा, सुर्य माथ्यावर आहे तोवर घामाच मोती पेराय्च या मातीत आणि ..मग त्या आभाळाला जाउन भिडायचे ...
दुख:च्या दिवसातलं आसवांच पाणी,सुखाच्या दिवसांतलं त्या सुखाकडं बघत घालवलेले दोन क्षणाचं हासु हे सारं देणं नाही बेटा , ही देणगी आहे देवाची जी आई बाप मुलांकडं सोपवतात त्यांची ती देणगी "वसा" म्हणुन तुझ्या मुलांकड तु नेउन पोहचवायची,... तु अशी उलटी गंगा का आणतुया? वसा पिढ्या दर पीढ्या चालवायचा असतो.
आपल्या प्रतीष्ठेचं आणि धनाचं ओझं वाहुन येडावलेल्या माणसासाठी तुझ्या आयु्ष्याचा दावा लावेल होय रे मी?, झाल गेलं गंगेला मिळाले ,’तो’देवाचा आदेश ही नाही समजला बेटा त्याला .. तर मी तरी कुठवर माझ्या सोन्यासाठी चिंधी सांभाळाची? आता माझ सोनं तुचं"
अमरने डोळे घट्ट मिटले.. .. तो मनाशी म्हणाला.माझ्या मोठ्या मनाच्या आईला मी छोटे करुन टाकले होते.
खांद्यावरचे मणामणाचं ओझ भुरकन खिडकितल्या चिमणी सारख उडुन गेले.
घामाने भिजल्या मानेवर झुळुकेचा स्पर्ष झाला.. अमरच्या अंगावर शहारा आला..तो भानावर आला.. कुठल्या तरी काळोख्या जागेतुन बाहेर आल्यावर डोळ्याला प्रकाश सहन होत नाही तस त्याला तो आनंद सहन होइना. मन दुखवणारा आनंद..!!!
relax होवुन त्याने खुर्चीवर पाठ टेकली... पुन्हा तीच अनुभुती.... तेच आकाश, तीच जागा, तेच घर.. तोच खिडकीसमोरचा उदास तलाव झिळमिळ झिळमिळ करुन फ़ेर धरु लागले . पुन्हा मोहर लाजु लागला.. कोकिळा गाउ लागली.. गोड शिरशिरी अंगभर नाचली.
.... तीला पुन्हा बहरुन आलेल पहायला अमर आतुर झाला.. " तीला नक्किच राग आला नसेल माझा जसा मला तीचा कधीच राग येत नाही...!!!"
(समाप्त)
Tuesday, 27 November 2007
ब्युरोक्रसी
नामा ऑफिसला बसल्या बसल्या काही रजिस्टर चाळत होता. नामा असिस्टंट तलाठी म्हणून नुकताच लागला होता. अजून रेव्हेन्यूत त्याच मडकं कच्चं होतं. आणि तलाठ्याकडं जी इतरांपेक्षा ग्रेट 'समजण्याची' कला असते ती त्याच्यात नव्हती. कामात त्याचा व्यत्यय नको म्हणून त्याला आज त्याच्या मुख्य तलाठ्यानं - शेळकेनं नायब तहसिलदार मॅडमपुढे बसवला होता. पण मॅडमला फोनवर गप्पा हाणण्यापासून फुरसतच नव्हती. अडलेला शब्द विचारण्यासाठी मघापासून तो बाईसाहेबांसमोर उभा होता.
फोन ठेवल्याबरोबर सवयीने मॅडम ओरडल्या, "आधी भायेर व्हा मग बोला...!"
"आता..! भायेरनं कसं काय बोलायचं?" नामा चाचरत म्हणाला.
बाजूच्या टेबलवरचा दळे मध्ये पडला, "मॅडम तो नवा तलाठी हे! आजच्याला इथेच थांबणारे..."
नामा नवीन नोकरीला लागलेला असल्याने उत्साह 'दाखवण्यासाठी' नवे नवे प्रश्न शोधत होता. दळेची अवस्था 'दळे काही न कळे' अशी होती. तोही नामासारखाच 'चुकून' रेव्हेन्यूत राहिलेला. मंत्री येणार त्या दिवशी साडी कोणती नेसावी या चिंतेत असलेल्या मॅडम, नामाने 'नोकरशाही म्हणजे काय?' म्हटल्यावर दळेकडे पाहून मनमोकळं हसत म्हणाल्या, "नामा, नोकरशाही म्हणजे सरकारचे व्याही, जेथे सगळे नोकर स्वत:ला शाही समजतात! कळलं?"
दळेने त्यावर नामाला "दे टाळी" म्हणले. नामाच्या सगळं डोक्यावरुन जात होतं. ‘च्यायला इथे कुणीच सरळ उत्तर देत नाही. काय तमाशा आहे.’ तो मनात म्हणाला. मॅडम परत आपल्या फोनवर बिझी झाल्या.
आज सकाळी सकाळी नाम्यावर परिणाम करणारी एक घटना घडली होती. ऑफिसला येण्यासाठी गावाच्या बस थांब्यावर नामा उभा होता. 'कालीपिली' भरली जात होती. कॉलेजात जाणार्या पोरंपोरींना कालीपिलीचा ड्रायव्हर आत ढकलत होता. मधल्या सिटवर सगळ्या पोरी भरून झाल्या, पण एक बाई मागं राहिली तशी 'आजून शिट शिल्लक हाये, या की आत, लयी जागा हे' म्हणत मधल्या शिटावरल्या पोरींना सरका सरका करत सरकवू लागला. आणि तीन जणींच्या जागी पाच जणी बसलेल्या पोरी अजून सरकू लागल्या. पलिकडं गाडीच्या दाराजवळ इंद्रा बसलेली होती. तिने एक उसळी मारुन सरकायचा प्रयत्न केला, तसे कालीपिलीचे दार उघडून ती धापदिशी डायरेक्ट नामावर जाऊन आदळली.
ड्रायव्हर पोर्यावर ओरडू लागला, "तरी म्हनलं होतं तुले की दोरी पक्की बांधजो फाटकले, पन तूबी नं! कंची शाळा शिकला रे? सकायपास्न तीन वार पॅशेंजर पडलं...!"
नामा आणि इंद्रा अंगावरची धूळ झटकत उभे राहिले. आणि प्रेमात पडले.
नामाने लागोलाग त्याचा एक खास मित्र गाठला, जो चोवीस तासांपैकी सोळा तास थांब्यावरच्या टपरीवर घोटाळत असायचा आणि त्याच्याकडनं इंद्राची सगळी माहिती गोळा करुनच आज नामा ऑफिसला आला होता. त्याच्या डोक्यात इंद्रा घोळत होती. ती पण शेळके भाऊसाहेबाची मुलगी! काय योगायोग बघा...! मग काय आपल्या भाऊसाहेबाला खुष करायचे सगळे प्रयत्न नामा करणार होता. पण सध्या इतक्या टेन्शनमध्ये त्यांना फक्त इम्प्रेस करत रहायचे एवढेच त्याने ठरवले होते.
दारात एक आजीबाई गडबड करीत होत्या. मॅडमने 'बघ' म्हणताच नामा भानावर आला. त्याच्याही अंगात जरा पॉवर आली.
"काये गा म्हतारे?"
"ओ बाबा, म्या सरोसोती, माजी म्हस मेली रातच्याला. तिचं पैसं इथे ही बया वाटती म्हून घ्याया आले. दरडावतो कशापायी."
नामा वरमून म्हणाला, "सरस्वती बाई असं नाय बोलाचं. मॅडम म्हणायच आसतं."
"सरसोती मॅडम ..म्हनलं! बोलू आता फुडं? एवढा गोठा भरुन कडबा घीन ठेवला तो कुणापुढं घालू आता? तुह्यापुढं की या बाईपुढं?" म्हातारीचं बोलणं ऐकून नामाची जिभच टाळूला चिकटली.
तेवढ्यात मॅडम ओरडल्या, "साहेब आले.साहेब आले. चला व्हा बाजूला."
दारात रावसाहेबांची गाडी येऊन थांबली. तहसिलदारांच्या गाडीतूनच 'प्रांत'ही उतरत होते (आज पुन्हा त्यांची गाडी त्यांच्या बायकोने नेली असावी.)
साहेब आता रोजच फेर्या करत होते. वनमंत्री भेट देणार होते. दप्तर नीट लावायची गरज नव्हती, ते काही ऑफिसला भेट देणार नव्हते. गावात फेमस मंदिर होते महादेवाचे, तिथं अभिषेक घालायचा होता त्यांना, तेही सपत्निक!
मागच्या मंत्र्याच्या टायमाला तलाठयांनी खूप गोंधळ घातला होता. खरंतर गोंधळ सगळ्यांनीच घातला होता, नाव तलाठ्याचं आलं होतं. (हल्लीच हे मंदिर भेटी द्यायला मंत्र्यांच्या बायकांत फेमस झाले होते. तसा इकडे लाल दिव्याच्या गाड्यांचा ओघ वाढला होता.) त्यामुळे या वेळी सगळे साहेब सजग होते. शेळके तिथला तलाठी होता आणि नामा त्याचा असिस्टंट.
आल्या आल्या प्रांतसाहेबांनी तहसिलदार, क्लार्क, तलाठी सगळ्यांना धुवायला सुरुवात केली. साहेब का धुताहेत हे विचारण्याची पद्धत रेव्हेन्यूत नाही. 'वरच्यांनी आपल्याला धुतले की ते गेल्यावर आपल्या खालच्याला आपण धुवायचे' एवढंच सूत्र असतं. हे माहित नसलेला नामा त्यामुळं बावचळून गेला होता. इतरांच्या हे सवयीचे झाल्याने ते बिनधास्त असते, पण मागच्या मंत्र्याच्या टायमाला एक तलाठी निलंबित झाला होता, तहसिलदार, प्रांतांना नोटीसा निघाल्या होत्या. सगळे अचानक आतून हलल्यासारखे उभे होते.
प्रांत कडाडले, " या.. या... या वेळेला तरी तयारी नीट झाली ना? की नुसतं 'हो, हो, हो झालं' सगळं? आयत्या वेळला गायी म्हशी मागं पाट्या धरून धरून फिरावं लागलं होतं. त्यामुळं एक तलाठी...."
"विलंबित झाला होता..." प्रांताचं वाक्य शेळकेनं पूर्ण केलं.
"विलंबित नाही निलंबित. पूर्ण सूचना सुद्धा ऐकत नाही. धावता आपले पुढं. शेळके चांगला नाचत नाचत आला होता ना तू रे.. मला हेच गाव पायजेल, पोरीचं इथेच जुळवायचंय म्हणून. या गावाला काम पण कराव लागतंय. समजलं का? सालं xxxxxxx. तलाठ्याला सारं जग महसूल यंत्रणेचा डोळा समजतं. समजतं का नाही?"
यावर सगळ्या तलाठ्यांचा उर अभिमानानं भरुन आला, शेळके जरा रीलॅक्स होऊन हसला.
"पण च्यायला, कुणाले हे माहित नाही की या डोळ्यात ‘फूल’ पडलेलं असतं" प्रांताच्या या वाक्यावर शेळके तोंडात मारल्यासारखे 'कुठून हसलो' विचार करत गप्प बसला. शेळकेसारख्या 'वाघ' तलाठ्याची शेळी झालेली बघताच नामाला उद्या तर अजून मोठ्ठे साहेब येणारेत तेव्हा काय व्हायचं याचं संकट पडलं.
'आपल्या ऑफिसाकडं चल' अशी खूण करताच शेळकेमागून नामा गपचुप चालू लागला. आपल्या ऑफिसबाहेर शेणाच्या थप्प्या येऊन पडलेल्या बघून नामाचा ‘आ’ वासलेलाच राहिला. बाहेर कोतवाल आणि दोन लोक डोक्यावर तगार्या घेऊन उभे होते. "येवढं गावलं बगा भाऊसाहेब! आजून आणाया निघालोत आता. काल तर रातच्याला आमी गोठ्या फुढंच झोपलोत. त्यो वास आजून नाकात नी डोक्यात घुसलाय. रातभर आशी पाळतच ठिऊन हुतो. येका म्हतारीची म्हस मेली तर ती लागली ना वरडाया तुमी नजर लावली म्हुन. भाऊसाहेब, ह्यो दर व्येळी मंत्र्याचा दौरा लयी कठिण जातो बगा."
कोतवालाकडं हळूच सरकत नामाने कोतवालाला विचारले "ह्यो शेणाची काय भानगड हाय?" शेळकेने नामाच्या या वाक्याला ऐकले आणि उखडून म्हणाला, "मंत्र्याच्या तोंडाला फासाचं हाय! त्याच त्वांड काळं करुन पगार वाढावायचाय माला. पोरीचं लगीन कराच म्हुन!"
काळं फासाचं? तेही सरकारी लोकांनी! काय बी काय? नामाला थरकं भरलं. 'आनी म्या काय हुंडा घ्यायाचो नाही', तो मनाशीच म्हणाला.
"आनी त्या आदी त्याना खायाला द्राक्षे आनून ठीव. इथली द्राक्षे फेमस आहेत." शेळकेनी हुकुम सोडला.
'हे बरंय! आधी द्राक्षे द्यायाची आणि मग काळं फासाचं'. नामाला वाटले त्यापेक्षा मंत्री साहेबांच्या बाईसाहेबांना सांगावे पगार वाढौन द्या म्हणून. त्यांचा हट्ट मंत्रीसाहेब टाळायचे नाहीत. त्याशिवाय का इथे पूजेला येतायेत.
कोतवालाला काय भानगड आहे विचारले तर भूत बघितल्यासारखा चेहरा करुन 'काय धाकले भाऊसाहेब, तुमीबी कायबी ईचारता' म्हणू लागला. आता हे शेण आणि इंद्रा यांच्या गोंधळात त्याचे डोके पार कामातून गेले.
दुसर्या दिवशी कलेक्टरसाहेबांच्या ऑफिस आणि साईट भेटीला सगळे घशात माशाचा काटा अडकल्यासारखे गुपचुप उभे राहिले.
"आमी काय म्हणते तुमाला S.D.O., ते कॅटल डंग मिळाले ना? आता मीच ते हेलीपॅड बगुन घेते. नीट झाले ना? चला आपन साईट बगुन येऊ की!" मोठ्या साहेबांनी सूचना दिली.
‘घेते?' नामाचा गोंधळ झाला. दळे कानात कुजबुजला, ‘साहेब तिकडचे हायेत ना मद्राशी म्हुन आसं बोलतात.’
प्रांताना त्यांचा मवाळ आवाज ऐकून बरे वाटले. आता त्यांच्याशी बोलायला हरकत नाही वाटून ते म्हणाले, "साहेब दोन दिवस से मैं रोज इथे आकर बघून घेता है, की हेलीपॅड अच्छा हो रहा है ना, वैसे काळजी का कुछ नही. हमने रास्तेपे खडी डालनेको P.W.D को बोल दिया है. वो लोग खड्डा बुझा देंगे. लेकिन वो लोग जरा चढेल है, सुनता नही है. आप अगर थोडा उनको आग्रह करेंगे तो काम जल्दी होगा. आणि वो नारियल, पूजा का सामान.. सब तयारी हो गयी है." प्रांताने पाचवीतल्या मुलाने हिंदीचे पुस्तक वाचावे त्या सुरात एक साथ म्हटले.
शेळकेची पण मग भिड चेपली, "साहेब रातको तो मैं झोपता बी गोठे के सामने. सुबह निकलने के बाद जेवनेको बी घर नही जाता. आप खुदकी आँखोनी बघो की म्हणजे लक्षामदी येईल. सगळे को काम के लिये एक दिन के आड में आने को बोल दिया है, मी ऑफिस में! और मैं दहाबारा बाई भी बुलाके लाया हू, या बारे प्रांत साहेबांनी उसमे खुद डोकं घाला तो बाया भी मान गयी." आवाजात पूर्ण जिलेबी घोळून झाली होती शेळकेची.
नामाचा त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक गोंधळ अजूनच वाढला होता.
"च्चला, मी बगूनच घेतो नी एकबार." असं म्हणून साहेब उठले. त्यांच्या मागे सगळी पलटण साईटवर निघाली. प्रांत घाईने साहेबांसोबत जाऊन बसले, कारण आजही त्यांची गाडी त्यांच्या बायकोने दळण आणायला पाठवली होती.
साहेबांची गाडी हेलीपॅड बघायला निघाली. त्यामागे तहसिलदार रावसाहेबांची पुढचे दात पडल्यासारखी दिसणारी निळी बाबा आदमच्या जमान्यातली जीप, त्यात कोंबून बसवलेले पाच तलाठी, पाच क्लार्क. तिला तिचा ड्रायव्हर प्रेमाने 'निलांबरी' म्हणायचा. तसं म्हणले की ती लवकर स्टार्ट होते असं त्याला आपले उगाच वाटायचे. पण यावेळी तिने त्याला धोका दिला. गाडी स्टार्टच होईना. सवयीने मागचे सगळे न बोलता उतरले आणि धक्का मारू लागले. गाडीत पुढे लोडाला टेकलेल्या शेठजीसारखे बसलेले रावसाहेब आणि आपल्या बापजाद्याच्या जमान्यापासून सरकारी सेवेत असल्यासारखी मग्रुरी चेहर्यावर घेतलेला ड्रायव्हर. मागून हातातल्या हँडबॅग आणि मोबाईल सावरत धक्का मारणारी मंडळी. अशी वरात कंपाऊंडबाहेर पडली नि समोरून रस्ता चुकून कलेक्टर साहेबांची गाडी परत येत होती.
समोरून येणारी ही मोठ्या साहेबांची गाडी मागून ढकलणार्यांना कुठची दिसतेय? ते आपले मन लावून ढकलतायत. गाडीतल्या दोन्ही साहेबांचे चिडलेले चेहरे बघून रावसाहेबांनी मागच्यांना थांबवायला उघडलेल्या तोंडातून शब्दच निघेना. ड्रायव्हर कसाबसा ओरडला, "थांबवा रे गड्यांनो लवकर थांबवा!" गड्यांना कसले ऐकू येतंय! स्टार्ट होईपर्यंत गाडी लोटायची त्यांना प्रॅक्टीस झाली होती. आणि जेव्हा ही निलांबरी जाऊन पांढर्या आंबॅशिडरवर जाऊन आदळली तेव्हा सरसकट सगळ्यांच्या चेहर्यावर तेहेतीस कोटी देव आठवल्याचा भास नामाला झाला आणि पांढर्या गाडीतल्या दोन मोठ्या साहेबातल्या छोट्या साहेबाला तर अशी उचकी लागली की ज्याचे नाव ते.
इकडे निळ्या गाडीतल्या रावसाहेबाची गत तर एखादा गरीब कुत्रा चुकून दुसर्या दादा कुत्र्यांच्या गल्लीत शिरल्यावर त्याची जी परिस्थिती होते त्या अवस्थेत (पळूनही जातात येत नाही आणि कुणावर उखडताही येत नाही!). त्यांनी जी मान खाली घातली ती जमिनीला टेकायचीच बाकी होती. गाडीमागच्या पलटणीला बसलेला धक्का गाड्यांच्या टकरीपेक्षा कैक पटीने जबरदस्त होता.
बघ्यांची गर्दी जमायला काय वेळ लागतो? ती गर्दी पाहून स्वत:ला आवरत चेहरा शक्य तेवढा निर्विकार ठेवत सगळ्यात मोठ्या साहेबांनी गाड्या हेलीपॅडकडे वळवण्याचा आदेश दिला. जाता जाता मात्र ते निळ्या गाडीकडे वळून पुटपुटले, "तहसिलदार हो या........" त्या त्यांच्या वाक्याच्या गाळलेल्या जागेत अंदाजाने सगळ्यांनी ’अ ते ज्ञ‘ मध्ये येणारी सगळी सुभाषिते भरली.
या सगळ्या भानगडीत नामाला गर्दीत इंद्रा दिसल्याचा भास झाला आणि त्याच्या छातीत भयानक धडधड सुरु झाली. अजून पुढे मंत्री आल्यावर काय होईल याच्या भितीने त्याच्या पोटात खड्डा पडला.
हेलीपॅडजवळ गाड्या थांबल्या. दहापंधरा बायका ते शेणाने सारवत होत्या. तहसिलदार आणि तलाठ्याची बोलती बंद होती. प्रांतानी कसाबसा घशातून आवाज काढला, "साहेब बघो, ये पूर्ण होनेकू आया है."
सारवलेले व्यवस्थित ग्राऊंड बघून कलेक्टरचा चेहरा खुलला. "अच्छा है!" म्हणून त्यांनी समाधानाने मान हलवली. हेलीपॅडला संमती मिळाली तशा गाड्या परत फिरल्या.
उद्याच्या कार्यक्रमाबद्दल अजून कुठलाच फॅक्स कसा आला नाही हा विचार करत कमिशनरच्या पीएने मागच्या पत्रावरुन वेळ बघितली. सकाळी दहा वाजता मंदिराजवळच्या हेलीपॅडवर साहेबांचे हेलिकॉप्टर उतरणार.
कमिशनरच्या पीएने 'सकाळी नऊ वाजता मंत्रीमहोदय मंदिराजवळ उतरतील' असा फॅक्स जिल्ह्याला पाठवून दिला. तो फॅक्स वाचताच कलेक्टरच्या पीएने प्रांताकडे ’मंत्रीमहोदय सकाळी आठ वाजता मंदिराजवळ उतरतील.’ असा फॅक्स नेहमीची वेळेबाबत काळजी घेऊन ताबडतोब पाठवून दिला. प्रांताच्या शिरस्तेदाराने फॅक्स वाचताच तहसिलदाराला तालुक्याला सकाळी सात वाजता मंत्री पूजेला येणारेत हे कळवून टाकले. तहसिलदारने अजिबात 'रिक्स' घ्यायची नाही असे ठरवले असल्याने शेळके तलाठ्याला बोलावून 'मंत्री सकाळी सहालाच इथे पोहचणार आहेत आणि तशा तयारीत रहा' असे सांगितले. मागच्या वेळी एक तलाठी निलंबित झाला होता हे आठवून शेळकेने पुजार्याला 'पहाटे पाचला मंत्रीसाहेब पूजेसाठी पोहचतील आणि आरतीची तयारी करायला तुमच्यासोबत माझ्या अशिश्टंटला देतो' म्हणून नामाला तिथे पहाटे चार वाजता बरोबर पक्के पोहचायला सांगितले.
इकडे आदल्या दिवसापर्यंत फॅक्स नाही की फोन नाही म्हणुन कमिशनरच्या पीएने पत्रावरची तारीख चेक केली. त्याच्या लक्षात आले महिन्याचा घोटाळा झालाय. 'तरीच विचार करत होतो चार दिवसाच्या सूचनेवर मंत्री कसे काय येताहेत?' त्याने मनाशी विचार केला. आता रात्र बरीच झालिये, कुणाला काय कळवून आपल्या बुद्धीचे दिवाळे दाखवा! उद्याच्याला लवकर येऊन तारीख बदलली म्हणून फॅक्स पाठवून देईन, या कानाचे त्या कानाला कळणार नाही. झाकली मूठ.... दुसर्या दिवशी तो ’मंत्री याच तारखेला याच वेळी पुढच्या महिन्यात येणार असल्याचा, पुढल्या महिन्यात दौरा हलवला गेल्याचा' फॅक्स करणार होता.
तर दुसर्या दिवशी मंत्री नऊ वाजता पोहचणार हा फॅक्स मिळाल्याने कलेक्टरसाहेब आठ वाजता मंदिराकडे जाण्यासाठी घराबाहेर पडणार होते. प्रांताकडचा फॅक्स आठचा असल्याने ते सात वाजताच मोठ्या साहेबांच्या बंगल्यापुढे त्यांच्या गाडीतून जाण्यासाठी थांबणार होते. तहसिलदारांना सातला मंत्री येणार कळले होते म्हणून ते सहाला घराबाहेर पडणार होते. शेळके पाचला पूजेचे सामान घेऊन मंदिराकडे निघायला आपल्या M80 ला किक मारणार होता. आणि मंत्री पहाटे चारच्या आरतीला येणार म्हणून आणि होणार्या सासर्याला इम्प्रेस करायला आणि आदल्या दिवसांच्या मिटींगचे त्याच्या अजून छातीत दुखत असल्याने, नामा पहाटे तीनला अंधारात गल्लीबोळातले भुंकणारे कुत्रे चुकवत मंदिराच्या दारात जाऊन त्यावरल्या कुलुपात इंद्राचा चेहरा बघत उभा होता.....!!!
Monday, 12 November 2007
थोडे हसा
अजुन थोड हसुन बघा तुम्हाला माझा हा मायबोली च्या दिवाळी अंकात आलेला विनोदी लेख( beurocracy बरी कशी?) वाचुन थोडे जरी हसु आले तरी तो लेख लिहिल्याचे समाधान मला मिळेल .धन्यवाद.
http://www.maayboli.com/node/618
Monday, 22 October 2007
वेशीचा पहिला फ़ेरफ़टका
berries चे दिवस संपलेच आहेत जवळ जवळ आणि तुरळक काही जाळ्यात black berries तेवढ्या शिल्लक आहेत . शिशिर भरात आहे आणि हिवाळा येउन ठेपलाय. दिवस लहान होऊ लागलाय. तरिही प्रत्येक वेळी प्रत्येक ऋतुत हा रस्ता इतका सुंदर दिसतो ना.जसे सुंदर स्री कशीही सुंदरच दिसते. सरळ Tolbar ओलांडुन Castortan ला न जाता. Little Castorton ला वळुन उभी चढण सायकलीने धापा टाकत चढावी(कारण शाळा सुटली तशी सायकल परत हातात आत्ताच आली) आणि टोक गाठताच समोर चरत असलेला रुपेरी घोडा धावत फ़ुरफ़ुरत त्याच्या फ़ाटकाशी येतो .अजिबात आढे वेढे न घेता आपल्या हातातले तीथलेच खुडुन घेतलेले गवत चघळत मान लवुन प्रेमळ नजरेने बघत मध्येच डोळे मिटुन निवांत उभा राहतो. मग मलाही निवांत उभे राहण्यावाचुन गत्यंतर नसते.तसा दम लागलेला असतोच. समोरच्या चरणा-या मेढ्यांना आजही काही फ़रक पडत नाही .नेहमीप्रमाणे खाली मान घालुन दिवस रात्र चरणे चालु. त्यांचे एक बरय त्यांना ना मायेने कुणी जवळ आलेल खपत ना ही माया करुन घ्यायला जायला, शेळी,गाय,घोडा कुत्रा ,मांजर अगदी कोम्बड्या सुद्धा येतात.पण मेंढ्या अह..!
मंद वा-याचे संगीत सोबतीला घेउन बार्ली डोलत उभी असते फ़िक्कुटलेल्या आभाळात ब-याचदा ढगच असतात .सुर्य सदानकदा लोळत पडलेला त्या मऊशार अंथरुणात. कधीतरी डोकाउन तरतरी देवुन जातो. त्या बरोबर लांबवर पसरलेल्या गोल गोल टेकड्यांना झळाळी मिळते. पाने नाचुन घेतात... गवत डुलुन घेते, वा-या सोबत बार्ली अजुन ताल पकडते. थंडगार
वा-याची झुळुक मानेवर आलेल्या घामावर फ़िरुन एक अजब शहारा ऊमट्वत गालावरुन शरिरभर फ़िरते. अंगावर काटा उभा राहतो थोड्या उष्णतेची गरज आहे अशी जाणिव होताच पुन्हा सायकल जोर पकडते.चढणीवरुन रस्ता घसरगुंडीसारखा उताराने Little Castorton गावात शिरतो. Shakespeare Tolthorpe वर आता जाणा-या गाड्यांची वर्दळ कमी आहे. कारण summer संपलेला आहे. तेथे छान open theater आहे. जेव्हा Shakespeare कळु लागेल तेव्हा बघेन अस मी मनाशीच पुन्हा म्हणत त्याच्या वरुन वळसा घेते. उतार संपुन पुन्हा चढ लागलेला असल्याने मला जरा थकुन इथे उतरावेच लागते पण तरि निवांत रमत गमत चालायला आवडते एक टुमदार एकांडया धीट शिलेदारासारखे एक घर इथे आहे. उंचच उंच दाट ओक ,चेस्ट्नट, मेपलची झाडी लागुनच कुरण आणि पुन्हा झाडी पलिकडचे थोडेसुद्धा कधी दिसत नाही. कधितरी तेथील जोडपे संध्याकाळी हातात वाईनचे ग्लास हातत घेउन रेलुन उभे असते. हसत हसत गुड ईव म्हणत पुढे जावे. कारण संवाद यापुढे फ़ार तर वेदर वर घसरेल त्यापुढे जाणार नसतो. पुन्हा एक मानेला झटका दिल्यासारखा उगाचाच लांब वळुन रस्ता उतार पकडतो सायकल हातात असली तरी उतारावर पाय धावु लागतात आणि तालबद्ध पाण्याच्या वाहण्याचे संगीत कानावर पडते. चुळुक बुळुक करत शुभ्र पाणी काठावरच्या लव्हाळींनी गुदगुल्या केल्यासारखे खिदळत चकाकत असते. अंगणात मुले चेह-यावर निरागस भाव घेउन एकमेकांच्या खोड्या काढुन खदखदतात, खुलुन हसतात ते पाहुन बाजेवर बसलेल्या म्हाता-या माणसांच्या गालातल्या गालात जसे हसु येते तसे तळाचे दगड गोटे बघुन वाटते. पाण्याच्या निरागस झुळझुळ हसण्याने त्यांनाही तसेच वाटत असावे. winter संपायला आला की आता फ़ुलायची वेळ आहे ही वर्दी द्यायला इथे snow drops झाडांच्या बुंध्याशी येउन थडीने गारठलेल्या वातावरणात जिवंतपणा आणतात. snow drops इतक्या नजाकतीने फ़ुलतात ना त्यांना जवळुन बघायला आपण आपोआप त्यांच्या पाशी खाली झुकतो. ground वर जमलेल्या चिल्ल्यापिल्यामध्ये जी चिव चिव होत असते ना तसेच अगदी हे snowdrops एकमेकांशी बोलत असावेत. त्यांचे खेळ आटोपल्यावर वसंतात इथेच काठावर पाण्याची दंगामस्ती बघायला daffodils गर्दी करतात. पिवळ्याधम्मक daffodils च्या आनंदाला उधाण येते. college च्या किंवा एखाद्या stadium च्या आवारत आपल्या आवडत्या तरुणाला खेळतांना बघायला सजुन सवरुन आलेल्या तरुणी ज्या उत्सुकतेने बघतात तसे ह्या daffodils च्या कळ्या काठावर दाटीवाटीने उभ्या राहतात.आपल्याच सौदंर्यात मग्न स्वतातच रमुन त्याच स्वप्निल नजरेने आजुबाजुला बघत बाकी कसलेही देणे घेणे नसल्यासारख्या महिना दोन महिने आपल्याही डोळ्यांना सुखावत त्या डुलत राहतात. अन..
(Wordsworth ची Daffodils तरंगत समोर येते
(क्रमशा:)...
Monday, 8 October 2007
असच काही
नकोच म्हणतात जेव्हा कागदावर उतरायला..
कुणी नसते सोबतीला...
नुसतीच शांतता...!!!
तीही नुसता गोंधळ घालते आणि
त्या क्षणाचे जीवन नुसतेच क्षण
बाकी काही उरत नाही.
सुख म्हणते "आप कतार मे है...!!"
काही क्षणातुन मिळणारे दुखाचे बाय प्रोडक्ट ..
ते सांभळता सांभाळता नाकी नौ येते..
"नुसते" बिना बाकीचे क्षण नकोसे होतात....
मला सरत्या उन्हातले रसरसते क्षण हवेत..
धुक्याच्या आवरणातले
अस्पष्ट आकृतीतूनु उमटणारे
मनाच्या कोप-यात पडुन
सुगावा न लागु देता स्क्रिन सेव्हर सारखे..
निश्चल मनात तरंग उमटवणारे.. ,
एकात एक गुंतलेले काही क्षण
त्यांचे कोडे कधी उलगडत नाही
सगळ्या बाजुने बघा ते तितकेच गुंतागुंतीचे..
आपल्यालाही गुंतवुन ठेवणारे..
कोडे सुटत नाही..
नुसतीच उत्तराची वाट पहाणे
अन त्या क्षणांचे तेच जुने बहाणे..
एखाद्या दिवशी क्षण क्षण जीवन बनते..
न सुटलेल्या कोड्याचेही काही वाटत नाही..
श्वासांचा ईतिहास लिहिला जातो आणि
क्षणाचाही विलंब न लावता.. माझ्या हाकेला "जिंदगी "
"ओ" देते..माझ्या आवाजातुन..
माझ्या हसण्यातुन.. माझ्या दिसण्यातुन..
माझ्यातली "मी" पुन्हा नव्याने उमलते..
मै उसकी परछाई हूँ
या वो मेरा आईना है
मेरे ही घर में रहता है
मेरे जैसा जाने कौन...!!!
Monday, 1 October 2007
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
(त्यानेच फोन उचलला वाटते.. नेमकं नको तेच झाल)
माझा फ़क्त हेलो ऐकुन त्याने लगेच आवाज ओळखला
फोनवरच मला पलिकडुन हुंदका ऐकु आला आणि पाठोपाठ जोरात रडणे..
ऐकवल नाही गेल... काय बोलु पुढे समजल नाही.. तसाच रीसिवर धरुन ठेवला अपराधी भावना दाटुन आली. माँ धावत आली आणि तीने पटकन त्याच्या हातुन फोन घेतला..
"रडु नाही बेटा ममा येतेय म्हणुन तर तीने फोन केला.. "
"नाही आत्ताच्या आत्ता..." रडत हुंदके देत तो परत मुस मुसु लागला.. "
मी फोन ठेवला आणि तडक बस stand गाठले. तीथुनच नव-र्याला फोन केला "मी लेकाला घ्यायला जातेय"पण गाव जवळ थोडेच होते, जायला १० तास लागणार होते.. तोवर बस मध्ये मी त्याच्या हुंदक्यासोबत ते दहा तास कसे घालवले माझ मला अजुन कळले नाही.
माझी परिक्षा असायची... दिवसच्या दिवस अभ्यास चालायचा आपल्या पेक्षा आईला ही पुस्तकं जास्त आवडतात म्हणून हा त्यावर पेनान खुप काही खरडुन ठेवायचा. आणि ही मध्येच गायब होते आपल्याला आजीकडे सोडुन, हे सुध्द्दा त्याच्या लक्षात यायचे.. .. (परिक्षेला महिना महिना लागायचा)
मग जर मध्यरात्री जाग आली आणि शेजारी मी नाही दिसली तर तीरासारखा मला शोधीत माझ्या study room मध्ये येउन मी आहे की गायब झाली याचा शोध घ्यायचा, मी दिसल्यावर हायसे वाटून मला "चल गोष्ट सांग... कालची नको.." मग मी नवी गोष्ट जुळ्वत सांगत रहाय्चे राजकुमार राक्षसाला मारुन परत येउन सगळं व्यवस्थीत होई पर्यन्त त्याला छान झोप लागलेली असायची..
परिक्षेच्या काळात माझा वाढदिवस आला. घरातल्या सगळ्यांनी फोन लावला याच्या हातात फोन देउन सगळे ममाला "Happy birth day" म्हण सांगत होते याने फोन घेतल्यावर "तु कधी येणारे?" एव्हढेच..
कधी एका जागी बसुन गप्प खेळणी खेळत बसला अस झाल नाही. सतत दंगा मस्ती आणि त्यासाठी ममाच लागायची. बाल्कनीतुन खाली छोटा ओढा दिसायचा तीथे बगळा यायचा त्याकडे बघत जेवल्याशिवाय जेवण गेल नाही. म्हशी याय्च्यात डुंबायला त्या दाखवुन मी म्हणाय्चे "बघ म्हशी..." तेव्हा पासुन एक म्हैस दिसली तरी "ती बघ म्हशी.."
सर्कशीला गेलो तर सगळे रिंगणाकडे बघुन खेळ बघताहेत आम्हि मात्र उलट्या दिशेने बसलेलो, का? तर मागे तंबुत हत्ती बांधलेले होते. मग पुर्ण तीन तास हत्तीसमोर उभे राहुन ते कसे खातात... काय करतात सगळ निरिक्षण चालले होते. जायची वेळ झाली शो सुटला तर "आता हतीला बाय करुन आमच्या घरी ये म्हणाव आम्ही निघालो"
यावर फ़ाडकन "तो जिना कशा काय चढेल? "(किती आपली ममा बावळट एव्हढा मोठा हत्ती आपल्या flat चे तीन जिने कसे चढेल?))
त्याचे हत्तीचे प्रचंड वेड (ते माझ्यकडूनच आले त्याच्याकडे) बघुन त्याला पहिल्यं दा बागेत हत्ती बघायला नेले. तेव्हा समोर एव्हढे प्रचंड धुड बघुन तो कमालिचा अस्वस्थ झाला चित्रात उंदराएव्हढा दिसणारा समोर एव्हढा असेल याची त्या ईवल्याश्या जीवाने कल्पन्नाच केली नव्हती. तशीच स्वारी मागे मागे सरकु लागली.. तोंड न वळ्वता एक टक त्या अजस्र प्राण्याकडे बघत मागे एक एक पाउल सरकु लागला.. "हती माझा मित्ल आहे" म्हणणा-रयाची ती गम्मत पाहुन आम्हा दोघांना हसु आवरले नाही.
नर्सरी सुरु झाली तसे पहिल्या दिवशी कुठेतरी फ़िरायला नेणार म्हणून स्वारी मजेत तयार झाली. जेव्हा तीथे मी थांबणार नाहिये हे त्याच्या लक्षात आले तो पर्यन्त उशीर झाला होता. मला गाडी काढतांना त्याच्या जोरात रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकु येत होता.
हळुहळु त्याला शाळेची सवय झाली. त्याने कधीही तु मला टाकुन का जातेस याची तक्रार केली नाही सतत माझ्यावर लक्ष ठेवुन हीला कुठेही जाउ द्यायचे नाही अस त्याला वाटायचे. एके दिवशी खुप सारं काम अभ्यास वैताग आला होता त्याला कधी नर्सरी त नेवुन सोडते आणि मग जरा निवांत पणे आवरते अस झाल होतं त्याला आंघोळिला घेतले तर अंग गरम लागले. आंघॊळ न घालता तसेच कपडे बदलले पण नर्सरीत नेउन सोडलेच. काही न बोलता तो गप्प बसुन राहिला. घरी आले तसं त्याचा तो गप्प असहाय चेहरा आठवुन खुप अस्वस्थ झाले तशीच परत फ़िरले. तो तसाच डोळ्यात पाणी अडवुन teacher च्या मागे शब्द रखडत बसुन होता. मला लगेच परत आल्याचे पाहुन teacher ने "त्याने आज आंघोळ नाही केली का?" विचारले (तीच्या बीचारीच्या तेव्हढेच लक्षात आले होते) मला बघुन त्याच्या चेह-यावर " आता ही नेणार का परत टाकुन जाणार" असे भाव दिसले. पटकन त्याला उचलुन घेतला आणि चालु लागले तसा तो पण बिलगला.. आणि मघापासुन बांध घातलेले आमचे डोळे वाहु लागले.
आई कडुन एकदा परत येतांना आमची बस पावसात अडकली ओढे, नद्या दुथडी भरुन वहात होते सगळे रस्ते बंद !..
गाडी इंचा ईंचा ने पुढे सरकत होती. पहाटे पाचला पोहचणारी गाडी दुपारचे बारा वाजले तरी अर्ध्या रस्त्यात होती. मागे पुढे ह्जारो बसेस, ट्रक, किलोमीटरच्या किलोमीटर रस्ताभर रांगाच रांगा .. जवळचे पाणी/ खाणं संपलेले . उन्हाने नुस्ते त्याचे हाल होत होते. काय करावे कळत नव्हते रांग हलत नाही अस म्हणुन मी जवळ एक खेडे दिसले तशी बस मधुन उतरले. धावत जाउन दार वाजवले आतुन उत्तर आले नाही दुसरे दार ... तीसरे दार चौथे दार कुणीच पाणी द्यायला सुध्दा तयार होईना कारण रांगामधल्या शेकडो प्रवास्यानी पाणी पाणी करत दार वाजवलेले होते, काय करणार ते तरी बिचारे ..
तशीच मागे फ़िरली तर रांग सुरु झाली होती बसेस पुढे सरकु लागल्या होत्या माझी बस कुठेच दिसेना...
धावत रस्त्यावर आले माझी बस खुप खुप पुढे गेली होती अगदी नजरेच्या पल्याड ... काही सुचले नाही तेव्हढ्यात एक बाइक वर हेलमेट आणि मिलिटरी पोशाखातला माणुस दिसला सरळ त्याच्या मागे जाउन बसले, त्याला विनंती केली.. बस पर्यंत नेउन सोडण्याची.. त्याने गाड्यामधुन वळणे घेत घेत बाइक पुढे काढली माझ्या बस जवळ गाडी येताच मला लेकाचा आवाज कानावर पडला "ममाsssssss ममाssss" सगळे गाडीतले समजावत होते. मी धावत जाउन बसमध्ये चढले. थोड्यावेळाने तो शांत झाल्यावर मला त्या बाइक वाल्याची आठवण झाली.पण तोवर तो कुठेच नव्हता. ........ त्याचा चेहराही मी बघितला नव्हता. ... देवाची आठवण झाल्याशिवाय राहवले नाही.
अशी एक आठवण आली की आठवणींच्या सरीवर सरी धावुन येतात ,... हस-या हळव्या... दोन्ही..
मुल लढायला शिकवते, मुल आपल्याला हळवं करते.... ते आपल्यात जिवंतपणा आणते. हे मात्र खरे..
माझ्या जाण्याची परत येण्याची त्याला सवय झाली job सुरु झाला. office मध्ये त्याला घेउन गेले.
का अभ्यास करवा लागतो ते त्याला त्या दिवशी कळले. खुप खुष झाला..
आम्ही दोघच सिनेमाला गेलो. छान पैकी होटेल मध्ये जेवलो.
आणि एके दिवशी माझ्या transfer चा call आला. पण आता त्याच्यात ती व्याकुळता आणि चल बिचलता सहन करण्याची ताकद आली होती. तो मी घरात नसली तरी राहु लागला. कोवळ्या वयात तो खुप शहाण पण शिकलाय मी रडले तर मला थोपटुन तो जेव्हा शांतपणे शेजारी बसुन राहतो तेव्हा मला प्रश्न पडतो,... हाच का तो? आताच्या आत्ता मला हे आणुन दे ते आणुन दे.. अभ्यास काय करते सारखा म्हणत माझ्या हातुन पुस्तक घेउन खेळ माझ्यासोबत म्हणनारा??
परत आयुष्याची दिशा बदलली नव-याची transfer ...... देश सोडायचा निर्णय झाला . माझी नोकरी ... ??? काय करावे पुन्हा त्याच्या वाचुन रहायची "ती" ताकद मी मिळवलेली नाही हे माझ्या केव्हाच लक्षात आले होते.
मी माझी नोकरी सोडुन जाण्याचा पर्याय निवडला.....
त्याला खुप छान समजुन घेणारे Mr.Fisher मीळाले. त्याला conduct and character चे award मिळाले तेव्हा most liable pupil म्हणुन Miss.Craig ने म्हटले. तसा
टाळ्यांच्या कडकडाटात त्याने तो मोठ्ठा त्याचे नाव कोरलेला कप घेतला तेव्हा माझ्या डोळ्यातल्या पाण्यात माझी office ची खुर्ची केव्हाच विरघळली होती.
कुछ लम्हे
और कुछ सिमटे हुए पल
और कुछ बिखरी हुई सी मै...
एक बिखरे हुए पल में
खुद को उस पल से जोडते हुए...
हर एक लम्हे में तुझ को तलाशती हुइ मै!!!!
Wednesday, 26 September 2007
कुछ लम्हे
- वक्त के साथ तनहाई से दोस्ती हो गयी
हालत ने हात पकडा दिया
बेचारी क्या करती..जिंदगी निभाती चली गयी...!!!
- जिंदिगीको खयालोमे कुछ ऐसे देखा था
कभी फ़ुल तो कभी मोती पिरोया था
सामने जब आयी तो अलगही अंदाज था
बस एक बारही उसने पलट के देखा था!!!
- जिंदगीको समझने से क्या होता था
काश एक बार अपनेही आखो मे झाका होता
जिंदगी वही मिल जाती उन चमकती दुनिया्में
जो सपने देखकर मस्त रह्ती है अपनी दुनिया में...!!!!
- गम सहा न गया तो छलक पडी आखें..
सुख मे भी यही रवैय्या अपनाती है ये आखें
पता नही मै कब सिखुंगी सुख और दु:ख को
एकही पलडे में तोलना..!!!
झुळुक
पाना पानात सांडतात
त्यावरले दोन हळवे थेंब
पुसून ती रांगोळी..
विस्कटत ओळी
पुसट होत जातात
पुन्हा मनाचे पान कोरे होते म्हणत... ....
जाउदे या शब्दांपेक्षा मौन व्रतच बरे होते !!!
झुळुक
शब्द आक्रसुन घेतात अर्थ
सारी भावना वितळत जाते
मौनाच्या अंधारात...
अन कविता होते व्यर्थ!
रात्रीच्या जगात उरतात जसे निस्तेज आकार..
तसे शब्दांचे अर्थहिन आकार
नुसतेच कागदावर साकार
तेव्हा वाट पहावीच लागते उजाडायची...!!!
Tuesday, 25 September 2007
पल पल दिल के पास
खिले खिले दो चमन....
ये जिंदगी कम ही सही कोई गम नही....
धरम आणि राखी गुंडापासुन लपत छपत आणि
एका अडचणीच्या ठिकाणी:) (आजकालच्या दिगदर्शकाने इथे गाण्याची आणि रोमान्स ची वाट लावली असती..) पण दिग्दर्शकाने एक सुखद धक्का दिला. खरतर चुकुन हे गाणे पाहण्यात आले आणि मग ते कुठल्या सिनेमा चे हा शोध लागल्यावर मी कपा्ळावर हात मारुन घेतला पण जेव्हा जेव्हा ऐकावीत तेव्हा तेव्हा तेव्हा Black mail ची गाणी वेड लावतात..
देरसे आयी...... आयी तो बहार ....
अंगारो पे सो कर जागा प्यार
तुफ़ानो मे फ़ुल खिलाये...
कैसा ये मिलन..
मिले मिले दो बदन ..
खिले खिले दो चमन
ये जिंदगी कम ही सही कोई गम नही....
ेराखी आणि धर्मेन्द्र चेहयावर सुंदर expression देतात.
राखी दिसतेही सुंदर आणि सोबत आता तीला तीचा आवाज नसल्याने आपल्यालाही बरे वाटते आणि धर्मेंद्रला ही...!
होठ वहि है, है वही मुस्कान
अब तक क्यो कर दबे रहे अरमान
बिते दिने को भुल ही जाये...
अब हम तुम सजन....
मिले मिले दो बदन
खिले खिले दो चमन
ये जिंदगी कम ही सही कोई गम नही..
ती दोघ जेव्हा अब जिंदगी कम ही सही म्हणतात ते अगदी सही आहे..
अस वाटुन जात.
(अर्ध्यापे़क्षा कमी कपडे घालुन धान्गड धिंगा करणा-या नव्या नटयानी आणि त्यांना नाचवणा-या नृत्य दिगदर्शकाने हे गाणे नक्की बघावे)
गुंडानी बराच वेळ गाण्यात येउनही गाण रोमँटिक च राहतं.
जेव्हा ऐकाव तेव्हा हे गाण दिवस रोमँटीक करुन टाकत. तसाच आजचा दिवस त्याने केला.
संध्याकाळ झाली आज वाचतच बसलिये. गाणी ऐकत...
एकीकडे पुन्हा वाचयला घेतलेल चौघीजणी आणि वर संपत आलेला समर ..
autumn ची चाहुल हुर हुर लावणारी .
पुन्हा पुन्हा पानगळ आठवत राहणे चांगले नव्हे . पण त्याआधीची ही झाडे रंगवुन टाकतात त्यांच्या रंगात..
आणि ती धुंदी हळु हळु पानगळी सोबत उतरत जाते.
उरते फ़क्त निश्पर्ण निश्प्राण शांतता....
आधी वाटे की कीती हे पानांचे झाडाशी बंध..., किती बांधीलकी .. नक्की कोण कुणाला बांधुन ठेवते कळतच नाही.. झाड पानांना की पान खोडाला...???
आणि अचानक ते लागेबंधे सोडुन ही पाने निघुन जातात अज्ञाताकडे...
पल पल सोबत करणारी पाने सरळ निघुन जातात...
Wednesday, 8 August 2007
नव्या घराची, नव्या गावाची पहीली गोष्ट.. पहिल्या स्पर्शातली
अगदी निदा फ़ाजली ची गजल आठवावी अशी सकाळ...
हवाए सर-सब्ज डालियों में
दुआओं कें गीत गा रही हैं
महकते फ़ुल्लंकी लोरीया
सोते रास्तों को जगा रही हैं
घनेरा पिपल,
गली के कोने से हाथ अपने हिला रहा है..
की बच्चे स्कुल जा रहे है.....
(गावात एकसारखा पिवळ्सर रंग दिसतो ना घरांचा त्यावरुन माझ्या गावाला England's fine yellow stone town म्हटले जाते... बघायची उत्सुकता आहे ना? मग Pride and prejudice बघा त्याच shooting इथेच झालय..)
हाच चकाकता रस्ता जेव्हा गावाबाहेर नेवुन सोडतो तेव्हा.... सारीकडे दिसते ती फ़क्त हिरवाई.. लवलवती हिरवी नाजुक पाती आणि गच्च हिरव्या रंगात न्हालेली झाडी , मधुनच चित्रकाराने brown रंगाचा फ़टकारा मारल्यासारखी काही पाने चमकत असतात.. प्रत्येक ऋतुत नवा रंग नवा ढंग दाखवत ही हिरवी वेस रंग उधळते. प्रत्येक दर्शनात पुन्हा पुन्हा मी या माझ्या गावाच्या आणि वेशीच्या प्रेमात पडते.
क्रमश:
Monday, 6 August 2007
वो जब याद आये......
खुप समजुतदार आणि लगेच खुप खुप वेड्यासारखे वागत....
ईतके की थोड्यावेळाने हसता हसता स्वता:चीच कीव यावी
....आणि न कळत डोळ्यात पाणी उभे रहावे.
व्याकुळ होवुन नुसतीच श्वासांची शांत रहाण्याची धडपड,
काहिहि न लपवता येणारा चेहरा लपवत भिरभिरत रहायचे.
स्वत:भोवती भिरभिरणा-र्या वार्यासोबत तो जो आठवणींचा गंध येत असतो
त्याला टाळत भिरं भि्रं होवुन जायचे....
आरशापुढे उभे राहुन गळ्यातला हुंदका अडवुन नजरेतल्या पाण्यात प्रतीबिम्ब बघत.......
मानेवर एक हलकासा सुगंधी श्वास अनुभवुन तीथुन काढता पाय घेतला तरी...
कुठुन तरी हळवी नजर पाठलाग करीत असल्याचे भास थांबत नाहीत
अजुन वा-र्यासोबत आलेल्या आठवणी परत गेलेल्या नसतात.... खरतर त्या जातच नाहीत कुठे!
प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला हळवी सोबत करत जगण्याची आठवण देत रोज नव्या क्षणाला जोडुन येतात
आणि नव्या उत्कटतेने रोज भेटतात...
Thursday, 19 July 2007
सांस्कृतिक प्रतीनिधी
तीची येण्याची तारिख जशी जशी जवळ येइल तसे तसे मला माझ्या कपड्यांचे sensor करावे लागणार एव्हढया एकमेव विचाराने माझे कपाट मी उपसुन काढले गुढग्यापर्यन्तचे ड्रेस्स,
sleeveless dress वेगळे,
गुढग्याखाली जाणारे ड्रेस्स,
झब्बे,long sleeves dress वेगळे
अस sorting करुन मी पहिल्या विभागात येणार्या कपड्यांचे गाठोडे बांधुन गँरेज मध्ये ठेवुन दिले तेव्हा कुठे मला हायसे वाटले.
प्रत्येक आई जगात देवाने unique piece अशी बनवली आहे. प्रत्येकीची अशी एक वेगळी ओळख आहे.
आपल्याला स्वप्नात आई साडीत दिसते किंवा कोणत्या वेळी आईने कसे वागले पाहिजे हे देखिल बर्याचदा आपल्या मनात पक्के असते. तसे माझ्या आईचे तीच्या मनात तीच्या मुलीची प्रतीमा पक्की आहे.(माझ्याही मनात खरतर माझ्या मुलाची अशीच प्रतीमा आहे) ती बदलायला ती अजिबात तयार नाही. एव्हढी एक गोष्ट सोडली तशी तीची विचरसरणी मला लहानपणापासुन प्रत्येक बाबतीत बर्याचदा चौकटीबाहेरची वाटते.... अतीशय वेगळी.. आणि छान..
जेव्हा वर्गातली शेजारची मुले आपल्या आईला "आई" , "मम्मी"म्हणुन हाक मारायचीत,... तेव्हा हीने आम्हला "माँ" म्हणायला शिकवले. रिकाम्या वेळात पुस्तक वाचणारी आणि painting करत बसणारी आई तेव्हाही आणि आताही आमच्या आख्या गावात तर ती एकमेव आहे. सुट्टीत आमच्यासोबत सायकलींग करणारी, एक आँगस्ट च्या आमच्या भाषणात दरवर्षी टिळकांच्या नविन नविन गोष्टी फ़क्त तीच्या वाचनामुळे असत मग सगळ्या शाळेतली scholar मुले भाषणाच्या स्पर्धेच्या तयारीसाठी आमच्या कडे असायचीत. तर विषय तो नव्हे (रम्य ते बालपण आणि माझी आई पुन्हा कधीतरी)
ती इकडे आल्यावर मला जर शक्य झाले असते तर रस्त्यावर चालणार्या प्रत्येक मुलीचे मी कपडे बदलले असते(असा विचार ती भारतात राहुन करते, [:)] खरतर इकडे आल्यानंतर मला आपल्या सगळ्या एकजात करीना रानी, बिपाशा वगैरे केविलवाण्या वाटायला लागल्या , बिचार्या फ़ार मर्यादीत प्रदर्शन करतात त्या मानाने त्यांचे.....)
आता आपण एखादा किल्ला बघायला तीला न्यावे आणि त्या ऐतीहासिक पार्श्वभुमीवर कोपर्यात एखादा love sceen सुरु असेल तर मीच तो अपराध(?) केल्यासार्खी मान खाली घालेन... फ़िरायला बाहेर निघावे आणि कुणीतरी हिमपरी दोनच कपड्यात सुर्यस्नान करत पहुडली असेल तर मी कडे कडेने (मांजर डोळे मिटुन दुध पिते त्या style मध्ये) काही दिसत नसल्यासारखे करुन चला थंडी वाजु लागली आता घरी जायला हरकत नाही म्हणेन. <टि. व्ही. पण केव्हा बघायला द्यायचा हे मी ठरवुन टाकलेय.>
काल मेक अप करता करता Bronte ने boyfriend शोधल्याची बातमी मला सांगितली, कारण ती आता high school ला गेली ना... . हेलनही त्याला भेटुन आली. "जय ला मी पुढच्या वर्षी छान girl friend शोधुन देइन don't worry !" Bronte ने अस म्हणाताच माझ्या तली Indian mother जागी झाली. "नाहीईईई" काही कळायच्या आत मी जोरात नाही म्हटले यावर Bronte "poor jay" !!!! म्हणुन गप्प बसली. कारण माझ्या डोक्यात तेव्हा फ़क्त मी जेव्हा high school ला गेले तेव्हा माझ्या माँ पप्पांनी आम्ही सुट्टीला मामाच्या गावाला असल्याने मोठ्ठे पत्र लिहुन आता अभ्यासाची माझी जबाबदारे कशी वाढली ... यापुढे माँ माझा अभ्यास घेणार नाही.... तो माझा मलाच करावा लागणार ई.. ई
असे चांगले दोन तीन मोठी पाने भरुन पत्र लिहिले होते.
हे एव्हढेच डोक्यात असल्याने हे boy friend girl friend प्रकरण.
हेलनला तर दर क्षणाला लक्षात असते मी Indian आहे. कधी कधी ती त्याचा उगाच ताण करुन घेते असही मला वाटते. पण मी सुद्धा तीच्याशी बोलतांना खुपदा उगाचच conservative बोलते अस मला वाटते.
पण आम्ही दोघी असतो तेव्हा आता तीच्या सोबतीने मी देखिल बिन्धास्त असते. केंब्रिजला दोघीच भटकत असतातंना असच रस्स्त्यावर चालता चालता कुणितरी सहज कोमेंट केली आणि हात दिला.. या बाई साहेबांनी लगेच प्रत्युतर म्हणुन तीतक्याच जोमाने जोरात टाटा केला,
"अग काय करतेस हे?" इती मी
"They are not harmful तु जरा वेळ तु कोण आहे हे विसरु शकत नाही का?" हेलन ने मला म्हटले. "निदान माझ्या सोबत असतांना तरी.. "आणि त्या नंतर मी हे लक्षात ठेवले.
आणि अमलातही आणले. पण तरीही तीचा ताण काही कमी होत नाही. Ester ला जेवता जेवता गप्पमध्ये विषय निघला "कुत्र्यांच्या नसबंदीचा" हेलन डोळे मोठे करुन तीच्या सासर्यांना "Remember आपल्यात एक Indian आहे ही लगेच आठवण करुन दिली . विषय तीथेच थांबला. गावात traditional village party होती. चला छान अतीशय English Party वातावरण पहायला मिळेल अस वाटल होतं पण हेलन म्हणाली "अग तीथे सगळे जण जरी fancy dress competition करणार असले ना तरी सगळ्यांना sexy दिसायचे असते. तुला नाही आवडणार. " "
"अग पण मी फ़क्त गम्मत बघेन "
पण तीच्या चेहयावरचा मी काय म्हणेन चा ताण पाहुन मीच नको म्हटल मग..
उगीचच मी तीथे भारताचं (संस्क्रुतीच?) प्रतीनिधित्व का करतेय? असा मला तेव्हा प्रश्न पडला..
तसच माझी आई सोबत आहे आणि आसपास हे सगळ दिसणार त्याचा ताण काही मनावरुन कमी होत नाही. पण इथला निसर्ग सगळ विसरायला लावतो तस तीही या निसर्गात मिसळुन खुष होइल ही खात्री आहे मल.. शिवाय हेलनेचे माझ्या आई पाप्पंना खुष करण्याचे अनेक plan आहेतच . कदाचीत हे सगळ आई गृहीत धरुन खिलाडु वृत्तीने किंवा अस असणारच किंवा इकडे social life वेगळ आहे .. अस कुठलही कारण मनाशी धरुन स्वीकारही करेल. आता हेलनच्या सगळ्या गोष्टींचा मी स्वीकार केलाच ना.. पण अ.. ह.. बघु काय होत ते..
Wednesday, 11 July 2007
बाजु
नाण्याला दोन बाजु असतात तश्या..... माणसाला मग स्री असो की पुरुष दोन बाजु असतात का ? सध्या रोज मुलांना make up करुन द्यायला जात होते. पहिल्या दिवशी प्रत्येक जण foundation लावुन घ्यायलाही का कु करत होता. मग lipstick ची तर बात लांबच. गालाला blusher लावुन जितके गाल लाल होत होते त्यापेक्षा जास्त लाजुन लाल होत होते. एकमेकांना चिडवणे तर ..जोरात अगदी ... हे हे ... lipstick लावलिस... खि... खि खि सगळी पोर एकमेकांचे रंगवलेले चेहरे पाहुन खु खु खु करत class room डोक्यावर घेत होते आणि हेलन ने तर जिमी चे पार हाल केले. " नाही कसा म्हणतो! make up ला चल बर ! म्हणुन दोन पायात पक्क पक्डुन ठेवले आणि मस्त पैकी त्याला रंगवुन काढले. आधी Bronte ने केलेला make up बरा होता तो हा पठ्ठ्या जाउन चेहरा धुवुन आला होता. Robin hood नाटाकाची ही पात्र जुन्या काळातली वयस्कर दाखवण्यासाठी आम्हि सुरकुत्यासारख्या रेषा काढल्या चेहर्य़ावर आणि वर भडक stage make up . पण इवली इवली मुलं मस्त दिसत होती. ज्याना अजिबात make up चा तिटकारा वाटत होता त्यांच्या साठि मी आवडती make up man होती. कारण मी जरा सौम्य make up करत होते. मुली सुध्दा सैनिक बनल्या होत्या त्यानी मात्र न लाजता दाढी मिशा लावुन घेतल्या. मुल जितकी lipstick ला लाजत होती तेव्हढ्या तर अजिबात लाजल्या नाहित. दुसया दिवसापासुन मात्र मुलांनी आपल्या आपल्या character मध्ये पुर्ण झोकुन दिले. मुलं more lipstick म्हणत होते . मुलिनी दाढी मिशा आणि काहिंनी तर चक्क छातीवर केस दाखवुन घेतले. चेहयावर scar लावुन घेतला.
मुलांनी आपले blusher lipstick, foundation चे colour choose केले.
त्यावर एकीची comment होती Now they realised their feminine side :) :) !!!!!
Friday, 16 February 2007
Thursday, 15 February 2007
स्रीसुक्त
सुरु झाला बालपणी संपत नाही अजुन...
गालावरती सरीता ग!
असायची चिंता भातुकलीच्या खाउची
सगळं आवर आता पुरे कर मैत्रीणिंशी गप्पाटप्पा,
म्हणुन पाठीत मिळायचा धपाटा
तरीही भातुकलीचा मोह नाही आवरायचा ....
आणि यायच्या गालावरती सरीता ग!
लक्ष ठेवणारे किती तारुण्याच्या चालीवर,
बोट नाही ठेवायचे समाजाच्या नियमांवर,
आयुष्याची वाट शोधायची या काट्यांच्या वळ्णावर
असे हे वेडं मुक्ततेचे वेध घेणारे वय
अन आवळायचे नियमांचे पाश .....
मग यायच्या गालावरती सरीता ग!
लक्ष दिव्यांच्या उत्सवात दोन नजरा मिळती
आणि सप्तपदी चालती,
आपला रस्ता त्याच्यामागे कायमचा बदलायचा ग,
मायेचा पदर अन बाबांची ओली नजर,
कायमची सोडतांना......
यायच्या आणि फ़िरुनी गालावरती सरीता ग
त्याचे जे ते सगळे माझे,
माझे ते त्याचे का नाही !
आपली वाट आपण नाही बनवायची,
त्याच्या मागे चालत रहायचे
अपमान, मान, स्वाभिमान....
सगळं काही सोडत सोडत
उरतात फक्त गालावरती सरीता ग......
सकाळी सकाळी
फ़ुल फ़ांदिवरुन पानावर घरंगळले
या पानावरुन त्या पानावर करत....
गवताने अलगद झेलले....
हरळीने खुणावले!......
नी पाकळीचा ओठ मुडपत ते गालातच हसले!
हलकेच नखरा करत ते दवबिंदुनी भिजले
सोनेरी किरणांनी न्हातेधुते झाले,
इंद्रधनुषी मणीमुकुट मिरवु लागले,
सकाळी सकाळी आयुष्याचे सुन्दर स्वप्न रंगवु लागले.........
Wednesday, 14 February 2007
Tuesday, 13 February 2007
आता नाही
हुरहुर मनी दाटणे आता नाही.
वाहुन गेल्या वेदना..
काही जपलेल्या संवेदना...
त्या... मुसळधार पावसात..
आता ते कोसळणे पुन्हा नाही..!!!
भिजणे आता नाही..
भिजुन पेटणे आता नाही
विझलेले क्षण ते तेवणे आता नाही..
पहिल्या पावसाची धगही आता नाही..
धगधगत्या ह्रुदयाची स्पंदने
ओल्या मिठित ऐकणे आता नाही
ती ओली मिठी सोडवणे पुन्हा नाही..!!!
रेशमी धारात तरसणे.. आता नाही..
प्रत्येक धारेत विरघळणे आता नाही
म्रुदगंध श्वासात भरुन धुंद होणे आता नाही..
मुसळधार पावसाचा जीवास घोर आता नाही...
ती सखी पुन्हा भेटणे आता नाही.....
ती पुर्वीची सखी पुन्हा भेटणे आता नाही...!!!
रात्र
चांदणं गोंदण गालावर उमटत
नजरेत दाटु लागली रात्र..
उन्मादत्या क्षणात,
मोहरत्या मनात हरवु लागली रात्र..
हळु हळु चंद्राच्या कवडश्यात
लाजु लागली रात्र..
आत आत खोल ठिबकत्या
श्वासात भिजु लागली रात्र..
नजरेच्या तीरात,आवेगाच्या
भरात सळसळु लागली रात्र..
व्याकुळ काजळात गुंफ़लेल्या
ओठात अडकु लागली रात्र..
निशब्द, अविचल आज अस्फ़ुट
हुंकारात बोलु लागली रात्र...
स्वप्नफ़ुले माखुन तनात,
स्पर्शात अविरत बरसु लागली रात्र..
रंगवुन माझे विश्व
ओंजळीतुन निसटत जाउ लागली रात्र..
नक्षत्राचा वेल विझवत,
प्राचीकडे झेपावत
अस्तित्व विसरु लागली रात्र..
बेभान धुंदीत तेजात मिसळत
धाऊ लागली रात्र..
दिवसाच्या प्रियकराची ही सावली रात्र...!!!
वडील
बालपणाला बाय करुन निघाले जेव्हा..
पैजण पाउले अंगणी थबकली तेव्हा...
गहीवरल्या दाराला.. खिडकिचा आडोसा होता
डबडबत्या पापण्यातुन मायेचा कवडसा होता.
माझ्या लाडक्या लेकराला " जपा " फ़क्त
एव्हढच म्हणालात तेव्हा तुम्ही पप्पा..
पाठिवर हात थरथरत होता...
रडता रडता सुध्दा तुम्ही माझेच डोळे पुसत होता. .
सांगत होता तरीही " आठवण नको काढुस,...
भुतकाळासाठी कधी नको रडुस,
स्वतंत्र व्यक्ती तु,... वेगळे तुझे " आकाश "
काळजी नको करुस.. आम्ही सुध्दा राहु इकडे झक्कास " !!
आठवत राहते पप्पा नेहमी तुमच्या सार्या गप्पा
करुन घेतलेली १ Aug च्या भाषणाची तयारी..!!
आणि पहिल्यांदा सायकल शिकवली तेव्हाची भरारी..
रागवायचे तेव्हा नजर तुमची करारी...!!
कसं विसरु सारं थांबत नाही हे बरसतं पाणी खारं...
एकदा विचारेन म्हणते देवाला..
मुलीच्या हातात का समाजाने बापाचा " कणा"द्यावा..
त्यालाच का लेकराच्या ताटातुटीचा शाप द्यावा..
कशी होउ उतराई... मनातुन काही जात नाही..
प्रयत्न मात्र नक्की करेन...
तुम्हाला अभीमान वाटेल असे काही करुन दाखवेन..
तेव्हा देवालासुध्दा वाटावे..
एक जन्म तरी मुलीचा बाप व्हावे...!!!
Over flow
ओघळुन पडतात गालावरुन.
उठतो तेव्हा ओरखडा.. मनावर...
येउ देत नाही मी माझाच हुंदका कानावर..!!
जाणवुही देत नाही माझे अस्तित्व मनाला.
नाहितर कुठेतरी पडेल ना ठिणगी..
सार काही पेटवायला..
त्यात कदाचित बळी जाइल माझ्या उत्क्रांतीचा..!
म्हणुन विसरत नाही कर्त्यव्याचे माप..
ठेउन देते बाजुला..
बंडखोर मनाचा शाप..!!
पण कसं सांगु..
उन्हातल.. इंद्रधनु खुणावल्याशिवाय राहत नाही..
तरी सुध्दा विचार चाललाय..
कस आवरायच खळबळत आयुष्य..
हे कोड सुटलं की ठरवेन म्हणते..
भावना, अस्ताव्यस्त पसरल्या की वाहवत जातात
अन बांध घातला की overflow होतात..(अस का?)!!!
सुवर्णमध्य
आणि मला ओढ सावलीची...
तुझे डोळे... उंच कड्यावर
मला ओढ माझ्या हिरव्या डोंगरमाथ्याची..
तुला हवे सारे आकाश.. कवेत
मला माझी धरती माझ्या पुरती...
झेप घ्यावी तीथुन क्षणांपुरती..,
पंख असावे आकाशी आणि पाय जमिनीवरती
मग एक सुवर्णमध्य काढला आपण...
बांधले घरटे झाडावरती....
तिथुन तु गाठतोस रोज नवे आकाश,
वाट पाहते मी तुझी जेवणासाठी दुपारी..
वेळेवर येत नाहिस आता तरी
मी काही फ़ार मनावर घेत नाही..
घर आवरणे,फ़रशी पुसणे,भांडी घासणे..
मी कुठे कमी पडत नाही..!
साग्रसंगीत जेवण, संसाराची ठेवण
आता मी सुबक ठेवते...
तुझ्यासाठी घरटे सजवुन
दाणापाणी हवे ते आणुन देते...
तु केव्हाही येउ शकतो,
रिकामे घरटे पाहुन परतु शकतो..
म्हणुन मी वाट बघत बसते..
काल तुझा मोबाईल विसरलास..
मी देण्यासाठी...
तुझ्यामागे झेपावण्याचा प्रयत्न केला
भरारी तर दुर.. मला उडणे सुध्दा जमले नाही..!!
झेप घेणे उंचीकडे सवय राहीली नाही
मनातल्या मनात सराव करुनही उडायला जमले नाही,
practical difficulties वेगळ्या असतात..
कळणार नाही तुला म्हणायचास ना तु..
किती खर आहे..
उडण्याचे स्वप्न बघुन उडता येत नाही पण...
पंख आहेत हे विसरुन जगताही येत नाही...!!!
विरह
आताच तर बरसायचे थांबले नभ...
अजुन कवडसाही नाही उन्हाचा...
आज.. असेच राहणार वाटते मळभ आभाळवर
आणि असह्य विरह...
पसरलेला दारापुढच्या... वाटेवर...!!!
माझी माती
समरसुन बरसती,
आज... ओल्या मातीला ग..
मायेचा वास का नाही...,
माझी माती लांब सयी...
कशी भेटु.. समजत नाही!!!
जीवनसागरा
गर्ता आहे प्रत्येकाच्या मनात ज्याला त्याला..
ठाव नाही लागत त्याचा अजुन कोणाला...
गर्त्याचे लाटेशी नाते,
जसे अंतरंग स्वप्नांशी जोडले जाते
बुडता बुडता आकाशी.. नेती या लाटा..
त्या खाली अंधार्या भुयारी.. दगडांच्या वाटा..
लाटेवरती क्षणांचे फ़ेसाळते बुडबुडे...
सारे क्षण.... ते बापुडवाने बुडबुड... उडती...
नाही ठसे नाही खुणा काही त्यांचे उरती...!!!
मासोळीला हवा गर्ता आणि लाटांना किनारा.....
ज्याचा त्याचा आहे इथे वेगवेगळा सहारा...
अनंत विस्ताराचा आहे खोल तुझा गाभारा....
सायंकाळी आवरायचा लाटांचा खेळ सारा...!!!
खोल खोल गहन तु.. जीवनसागरा..
नाही माहित उंची तुज पामरा..
तरीही आवडते तुझ्यात प्रतिबिंबित व्हावयाला
म्हणुन गाठते तुला नभ ते क्षितीजाला...!!!
उमजले तिथेच मला वेडे स्वप्न लाटेचे..
भिडण्याचे आकाशाला...
घेउन उदराशी बिज..
अंकुरण्या किनार्याला...
खोल खोल गर्ता आणि उंच उंच लाटा....!!!
व्याकुळ
तुला डोळे भरुन बघतांना
पापण्या काठोकाठ भरल्या...
धुसर झालास तु...
दृष्टीआड गेलास..,
पण नजरेतल्या पाण्यात प्रतिबिंबत राहिलास,
तु नसतांनाही...
गुलाबी कमळातुन..
आठवणींची मेघगर्दी ओघळत राहिली,
आता तु कधीच दिसणार नाहिस.. तरीही..
पापणी भरुन येतेच मग सारे जगच धुसर होते...
अन त्या डबडबत्या डोळ्यात तुझे प्रतीबिंब बुडुन जाते....!!!
Tuesday, 6 February 2007
ॐ
काही खुजे काही दुजे
शब्द मिरवतो पुढे..
भावना राहती मागे..
कधी शांततेत कोसळतात
कधी उसळतात..
डौलाने मीरवतात..
सारे राग लोभ झेलतात...
शब्द सार.. शब्द विचार..
शब्द कल्पनेचा पसारा
शब्द काळ्जाचा शहारा
शब्द माझे आत्मभान
आयुष्याचे सुंदर गान..
त्या शब्दांसा्ठीच तर हे पान...
जरी अबोल मी
भावनेचे तरंग शब्दात रंगवते
मनमोराचा पिसारा असा खुलवते...
मग शांतता शब्दातुन बोलते.......